Restrictions in the district partially relaxed Rahul Rekhawar sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : जिल्ह्यात निर्बंध अंशतः शिथिल ; राहुल रेखावार

जिल्हाधिकारी राहुल रेखावार; आजपासून नवे नियम लागू

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात होणाऱ्या विविध खेळांच्या स्पर्धांत बंदिस्त आणि खुल्या मैदानात होणाऱ्या खेळांसाठी २५ टक्के आसन क्षमता किंवा २०० व्यक्तींपर्यंत परवानगी असेल. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू राहतील. ५० व्यक्तींच्या उपस्थितीत यात्रा व जत्रा करता येईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

जत्रेतील स्टॉल सुरक्षित अंतर ठेवून सुरू राहतील. कोरोना संसर्गाचे नियम व अटींचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. तीनपदरी किंवा एन-९५ मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक असल्याचे श्री. रेखवार यांनी सांगितले. हा नियम उद्या (ता. ३)पासून जिल्ह्यासाठी लागू होणार आहे.

जिल्ह्यातील ९० टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक पहिला डोस घेतला आहे आणि ७० टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध अंशतः शिथिल केले आहेत, असे आदेशात म्हटले आहे. ९ जानेवारीला दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्‍यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत निर्बंध होते, हा नियम शिथिल केला आहे. तर, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरू केली आहेत.

मात्र, पर्यटनाच्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. त्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होते की नाही, याच्या तपासणीसाठी पथके नियुक्त करावीत. पर्यटनठिकाणी पोलिस तैनात असावेत. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे थर्मल स्कॅनिंग करावे. एखाद्याला ताप असेल तर त्याला प्रवेश देवू नये. तीन पदरी मास्क वापरणे बंधनकारक आहे.

असे असतील नियम

  • खेळ, स्पर्धांसाठी २०० व्यक्ती

  • जत्रा- यात्रांसाठी ५० व्यक्ती

  • यात्रा, जत्रा, पर्यटनस्थळे नियम पाळून सुरू

  • रात्री ११ ते पहाटे ५ फिरण्यास परवानगी

  • नियम पाळत आठवडा बाजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT