results of the ssc will be announced tomorrow 
कोल्हापूर

दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता होणार जाहीर...

संदीप खांडेकर

कोल्हापूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल उद्या (ता.29) दुपारी एक वाजता जाहीर होत आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. कोरोनामुळे दहावीचा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला असला तरी त्याची विद्यार्थ्यांत उत्सुकता आहे. 

यंदा कोरोनाच्या संचारबंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम उशीरा झाले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी निकाल जाहीर होतो. यंदा मात्र निकाल जाहीर करण्यासाठी जुलैचा शेवटचा आठवडा उजाडला आहे. कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागातून तब्बल 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. विद्यार्थ्यांना www.maharesult.nic.in वेबसाईटवरून निकालाची प्रत उपलब्ध होणार आहे. तसेच www.mahsscboard.in वेबसाईटवरून कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट, तर छायाप्रतीसाठी 18 ऑगस्टपर्यंत http://verification-ssc.ac.in  वेबसाईटवर शाळांतर्फे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT