The resumption of the lockdown has created uncertainty in the Class ssc exams 
कोल्हापूर

दहावीच्या परीक्षेचं आता नेमकं काय ?

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात आल्याने दहावीच्या परीक्षेवर अनिश्‍चिततेचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ झाली असुन शिक्षण खात्याने परीक्षेबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे बनले आहे.

शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर चार मे ला दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती दिली होती. तसेच अधिकाऱ्यांना परीक्षेची तयारी करा अशा सुचना केल्या होत्या परंतु शुक्रवारी 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाठविण्यात आल्याने परीक्षा लवकर घेणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा वाट पहावी लागणार आहे. शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे 27 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत परीक्षा पार पडणार होती. परंतु लॉकडाऊनमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे तेंव्हापासुन शिक्षण मंत्री व शिक्षणाधिकारी परीक्षेबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असुन चार मे ला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार होते मात्र आता 17 मे नंतरच परीक्षा कधी घ्यावी याबाबत विचार विनिमय होण्याची शक्‍यता आहे.

दिड महिन्यांपेक्षा अधिक दिवस परीक्षा लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढत असुन दररोज अभ्यास करण्याकडेही विद्यार्थी दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे विलंबाने परीक्षा घेतली तरी निकालावर परीणाम होईल असे मत शिक्षकांमधुन व्यक्‍त होत असुन अधिक दिवस परीक्षा लांबणीवर पडली तर विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होणार आहे. याकडे शिक्षण खात्याने वेळीच लक्ष देणे आवश्‍यक असल्याचे मतही व्यक्‍त होत आहे.
 

दहावी परीक्षेबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही मात्र विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दखल शिक्षण खात्याकडुन घेतली जात आहे.
- ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT