कोल्हापूर

अंड्यांची किरकोळ विक्री वाढीव दराने 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : दोन दिवसांत अंड्यांच्या दरात दीड रुपयाची घसरण झाल्याने अंडी उत्पादकांत नाराजी आहे. एका बाजूला मागणी वाढत असताना दरात घसरण होतेच कशी, अशी विचारणा अंडी उत्पादक करत आहेत. दरम्यान, अंड्यांच्या दरात घसरण झाली असली तर किरकोळ अंडी विक्रेत्यांकडून मात्र 5 रुपये 50 पैसे ते 6 रुपयाने अंड्यांची विक्री सुरु आहे. अंडी उत्पादकांसह ग्राहकांचा तोटा करून नेमका फायदा कोणाचा होतो, अशी विचारणा होत आहे. 

कोरोनाची सुरवात झाल्यानंतर गैरसमजातून अंडी आणि चिकनकडे लोकांनी पाठ फिरवली. त्यामुळे 4 ते 5 रुपयांचे अंडे 80 पैशाला, तर काही ठिकाणी फुकट वाटण्याची वेळ आली, तर 100 रुपयाला चार कोंबड्या विकण्याची वेळ पोल्ट्री व्यावसायिकांवर आली; मात्र कालांतराने हा गैरसजम दूर झाला आणि अंडी आणि चिकनला मागणी वाढली. मागील दोन दिवस राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने अंडी विक्रीच्या दरात दीड रुपयांची कपात केली आहे.

त्यामुळे अंडी उत्पादकांनी समन्वय समितीला टार्गेट केले आहे. नेमके कोणासाठी या दरात कपात केली, अशी विचारणा त्यांच्याकडून होऊ लागली आहे. ज्या भांडवलदारांना पडत्या काळात स्वस्तात अंडी खरेदी करून ती कोल्डस्टोअरेजला साठवली, या अंड्यांची विक्री व्हावी व पुन्हा उत्पादकांकडून स्वस्तात अंडी खरेदी करता यावी, यासाठीचा दरात घसरण केल्याचा आरोप केला आहे. 

अंड्यांना चांगली मागणी असताना नेकने दरात कपात का केली? अचानक लोकांनी अंड्याची खरेदी बंद केली आहे का? असे नसेल तर दर कपात का केली, याचे उत्तर नेकने द्यावे. मोठ्या भांडवलदारांना या निर्णयाचा फायदा होण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याप्रकरणी नेकच्या अध्यक्षांनी लक्ष घालावे. 
- वाय. आर. पाटील, अंडी उत्पादक.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT