Retired police officer Annasaheb Gavhane suicide cases in sangli latest news breaking news  
कोल्हापूर

धक्कादायक! कर्जबाजारीपणाने झाले बेजार ; कुटुंबात तिघांनीही संपवली जीवनयात्रा 

प्रमोद जेरे

मिरज (सांगली) : अनेकांना कुटुंब उभा करण्यामध्ये अख्खी हयात जाते. पण एका क्षणातच संपूर्ण कुटुंबच मानसिक तणावातून उध्वस्त करणे हे खुप धक्कादायक असत. अशीच एक घटना बेळंकी येथे घडली आहे. या घटेनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या

बेळंकी येथील  पोलिस निवृत्त पोलिस कर्मचारी अण्णासाहेब गव्हाणे या एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली.अण्णासाहेब गुरुसिद्ध गव्हाणे( वय 67) त्यांची पत्नी मालती अण्णासाहेब गव्हाणे (वय52 )आणि मुलगा महेश अण्णासाहेब गव्हाणे (वय 28) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. अण्णासाहेब गव्हाणे हे सांगली जिल्हा पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी आहेत. आज (शनिवारी) सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे शेजार्‍यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गावचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील  यांनी घटनास्थळी धाव घेवून याची माहिती घेतली आणि याबाबत तातडीने मिरज ग्रामीण पोलिसांना अहवाल पाठवला. 

 चिठ्ठीतून झाला उलघडा
मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी  धाव घेऊन घटनेची पाहणी केली असता या ठिकाणी आत्महत्येचे कारण नमूद असलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. प्रथम दर्शनी पाहणीमध्ये पोलिसांना या आत्महत्या कर्जबाजारीपणातून झाल्याचे निदर्शनास आले आहे.  सांगली मिरज आणि तासगाव येथे काम केलेल्या पोलिस निवृत्त पोलिस कर्मचारी अण्णासाहेब गव्हाणे यांचा मुलगा महेश गव्हाणे याने शेअर मार्केट दलालीचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायात तोटा झाल्याने त्याने खाजगी सावकारांकडूनही कर्ज काढल्याची चर्चा होती. याच कर्जबाजारीपणातून कुटुंबाने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समजले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजन पाटलांच्या 50 वर्षांच्या साम्राज्याला आव्हान; कोण आहेत उज्ज्वला थिटे? बिनविरोधची परंपरा खंडीत

Latest Marathi Breaking News: मुंबईत CNGचा तुटवडा, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Ladki Bahin Yojana: मुदत वाढली, पण तांत्रिक अडचणी कायम? e-KYC बाबत नवीन अपडेट; महिलांचा प्रश्न पूर्णपणे सुटणार

Women Farming Success Story:'ममताबाई भांगरेंनी पिकवला पाच फुटांचा दुधी भोपळा'; सेंद्रिय शेतीतून यश; अनेक प्रयोग आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले

Pune Navale Bridge: नवले पुलाजवळ तातडीने उपाययोजना करा; डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, भीषण अपघाताची तत्काळ चौकशी करावी

SCROLL FOR NEXT