revenue minister and state president balasaheb thorat warned Congress protest against agriculture law 
कोल्हापूर

तमाम शेतकरी आणि कामगार वर्ग सरकारला  नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत: बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : केंद्र सरकारने कामगारांचे कायदे संपवून टाकले आहेत.कामगारांचा विचार केला नाही तर केवळ  मालकांचा विचार केला आहे. हे सरकार कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. तमाम शेतकरी आणि कामगार वर्ग सरकारला  नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा महसूल मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष  बाळासाहेब थोरात यांनी दिला.


  केंद्र सरकारच्या कृषी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने आज भव्य रॅली काढण्यात आली.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महसूल मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात,पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार पी एन पाटील, , आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सुमारे 500 हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून दुपारी साडेबाराच्या सुमारास दसरा चौक परिसरात रॅली दाखल झाली. या ठिकाणी शेतकरी विरोधी कृषी कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका काँग्रेसचे प्रमुख मंडळी जाहीर करतांना श्री. थोरात यांनी केंद्र शासनावर जोरदार टिका केली.


 यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज  पाटील म्हणाले, शेतकऱ्यांबाबत घेतलेला निर्णय त्यांच्या हिताचा नाही . त्यामुळे या विरोधात काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. केंद्राच्या या धोरणाला  महाराष्ट्र सरकार ही विरोध करेल.कृषीविषयक धोरणाबाबत समर्थन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी डांबरी रस्त्यावरून समर्थन करू नये. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांची परिस्थिती पहावी असा टोला पालकमंत्रीसतेज  पाटील यांनी मारला.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

Deepti Sharma: गेल्या वर्षी वर्ल्ड कप जिंकवला, अन् आता पाकिस्तानलाही नडली! भारताच्या 'या' लेकीने ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हटलं?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

Latest Marathi News Live Update : पद्मसिंह पाटील कोर्टात दाखल

Whatsapp मध्ये मोठं अपडेट! आता विना मोबाईल करता येणार व्हिडिओ अन् ग्रुप वॉइस कॉल; पण कसं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT