Revenue Minister Balasaheb Thorat approves construction of new building for Karveer tehsil office kolhapur marathi news 
कोल्हापूर

Good News: करवीर तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची मान्यता; एवढ्या कोटींचा मिळणार निधी

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर :  गेल्या अनेक वर्षांपासून करवीर तहसिल कार्यालय आणि करवीर पोलीस ठाणे भाऊसिंगजी रोडवरती एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. कार्यालयास देखील खुरड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सुसज्ज इमारती मध्ये नविन तहसिल कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षा पासून केली जात आहे. त्याची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार आता निधी मंजूर झाला आहे


राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) तथा कोल्हापुरचे पालकमंत्री ना. सतेज  डी. पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर शहरातील करवीर तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली असून त्याकरिता १४ कोटी ९८ लाख ८२ हजार ४८६ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे करवीर तहसिल कार्यालयास लवकरच सुसज्ज इमारत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

  इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिल्याचा शासन निर्णय गुरुवारी निगर्मित करण्यात आला आहे. यामुळे करवीर तालुक्यातील नागरिकांना सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशी प्रशासकीय इमारत लाभणार आहे. याच इमारतीतील करवीर पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी  ७३ लाख २३ हजार ८९८/- इतका निधी गृह विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री ना. पाटील यांनी सांगीतले.
 निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यानी सहकार्य केल्याचे मंत्री पाटील यांनी सांगीतले.    

संपादन- अर्चना बनगे     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT