RFID equipment has been installed on buildings in Belgaum city under Smart City scheme 
कोल्हापूर

बेळगावातील 1 लाख 10 हजार इमारतींवर बसवले जाणार आहे 'हे' उपकरण ; काय काम आहे 'त्या' उपकरणाचे ?

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - स्मार्ट सिटी योजनेतून बेळगाव शहरातील 1 लाख 10 हजार इमारतींवर आरएफआयडी उपकरण बसविण्यात आले आहे. या उपकरणांमुळे बेळगाव महापालिकेची घंटागाडी योजना शंभर टक्के यशस्वी होणार आहे. 2019 सालच्या अखेरीस शहरातील काही इमारत मालकांनी आपल्या घरावरील हे आरएफआयडी उपकरण काढून टाकले. त्यामुळे अशा किती इमारतींवरील उपकरण काढून टाकले आहे याचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. ते सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नव्याने त्या इमारतींवर उपकरण बसविले जाणार आहे. त्यानंतर या उपकरणांच्या सहाय्याने घंटागाडी योजना पूर्ण क्षमतेने राबविली जाणार आहे.

ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी, कचऱ्याची वर्गीकरण करण्यासाठी घंटागाडी योजना अत्यंत महत्वाची आहे. शिवाय यामुळे घरातील कचरा रस्त्यावर टाकण्याचा प्रकारही थांबणार आहे. बेळगाव शहरात गेल्या चौदा वर्षांपासून घंटागाडी योजना राबविली जात आहे. पण ती योजना शंभर टक्के यशस्वी झालेली नाही. त्यामुळे ही योजना यशस्वी करण्यासाठी स्मार्ट सिटी विभाग पुढे आला. या विभागाने शहरातील प्रत्येक इमारतीवर रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन डिव्हाईस या नावाचे उपकरण बसविण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापूर्वी हे उपकरण बसविण्याची योजना स्मार्ट सिटी विभागाने हाती घेतली. या उपकरणासोबत एक रीडर नावाचे उपकरण घंटागाडी चालकाला देण्याचा निर्णय झाला. एखाद्या घरातील कचऱ्याची उचल झाली की घंटागाडी चालकांने त्याच्याकडील रीडर उपकरणासमोर धरावयाचे. लागलीच त्याची नोंद स्मार्ट सिटी योजनेच्या कमांड व कंट्रोल सेंटरमध्ये होईल. त्यामुळे दररोज शहरातील किती घरांमधील कचऱ्याची उचल झाली व किती घरांमधील उचल झाली नाही याची माहिती एका ठिकाणी बसून घेता येईल. पण गतवर्षी एनआरसीचा विषय चर्चेत आल्यानंतर शहरात या आरएफआयडीबद्दल गैरसमज पसरविण्यात आले. एनआरसीसाठी हे उपकरण बसविण्यात आले आहे, त्यात छुपा कॅमेरा आहे असा अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे अनेकानी ते उपकरण काढून टाकले. त्यामुळे स्मार्ट सिटी विभागाचे मोठे नुकसान तर झाले. शिवाय या योजनेच्या अंमलबजावणीला विलंबही झाला.

आता शहरात सर्वेक्षण करून किती घरांवरील उपकरण काढून टाकले आहे, घंटागाडी चालकांसाठी किती अतिरीक्त रिडर्सची गरज भासणार आहे याची माहिती घेतली जात आहे. नव्याने आरएफआयडी उपकरण बसविले जाईल, ही योजना स्मार्ट सिटी विभागाकडून महापालिकेला हस्तांतरीत केली जाईल. येत्या दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही योजना राबविली जाणार आहे. ज्या इमारतीमधील ओला व सुका कचरा दिला जाणार नाही, किंवा जे घंटागाडी चालक प्रत्येक इमातीमध्ये जावून कचरा घेणार नाहीत, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT