कोल्हापूर

RISING STAR: कोल्हापूरच्या प्रवीणची उडी जगात गाजणार? शेतमजूर आईबापांच नाव करतोय मोठं

सकाळ वृत्तसेवा

प्रवीण चित्रवेल, तिहेरी लांब उडीतील आणखी एक आश्वासक नाव. २१ वर्षीय हा युवा क्रीडापटू अऩंत अडचणींवर मात करीत येथपर्यंत पोहोचला आहे. आई-वडील शेतमजूर. काबाडकष्ट हेच जीवन. त्यातून त्याला योग्य गुरू योग्य वेळी मिळत गेले आणि आज प्रवीण तिहेरी उडीत १७ मीटरचा पल्ला पार करणारा देशातील चौथा खेळाडू ठरला आहे. इयत्ता सातवीतच तो घरापासून दूर झाला आणि स्वतःच्या करिअरमधील अनेक खाचखळग्यांना सामोरा गेला आहे.

प्रवीण चर्चेत आला तो २०१८ च्या यूथ ऑलिम्पिकपासून. या स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकाविले. त्यावेळी प्रवीण १७ वर्षांचा होता. तंजावर जिल्ह्यातील एका छोट्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. खेलो इंडियाच्या पहिल्या हंगामात त्याने सुवर्णपदक जिंकले आणि त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. या प्रवासात त्याला प्रशिक्षक इंदिरा सुरेश यांनी तोलामोलाची साथ दिली. प्रवीण सातवीत होत तेव्हा त्याला त्यांनी एका स्पर्धेत पाहिले. त्याची क्षमता पाहून त्यांनी त्याला आपले शिष्यच करून घेतले. त्याच्या घरची परिस्थिती पाहून इंदिरा यांनी पुढाकार घेऊन त्याच्या सर्व खर्चाचा भार पेलला.

चेन्नईतून त्यांची बदली नागरकोईलमध्ये झाली. त्यावेळी प्रवीणने त्यांच्याकडेच पुढील प्रशिक्षण घेण्याचा आग्रह धरला. नाही-हो करीत इंदिरा यांनी त्याला आपल्या सोबत नागरकोईलमध्ये नेले आणि प्रवीणचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. पहिल्या टप्‍प्यातच त्याने कोईमतूर येथे झालेल्या कनिष्ठांच्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. गेले पाच ते सहा वर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या सरावाला यानिमित्ताने गोळ फळे दिसली. या पाच वर्षांत तो एकाद-दुसरा प्रसंग सोडला तर घरी गेलेलाच नव्हता.

अलीकडच्या काही वर्षांत त्याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळाले. योंद्री बेटान्झोस त्यापैकीच एकच. दोघांना एकमेकांच्या भाषेबद्दलही गंध नव्हता. तरीही त्यांच्यातील संवाद उत्तम होता. आपली कामगिरी खराब झाली, सरावात चुकला तर प्रवीणने झणझणीत शब्द योंद्रीला शिकवून ठेवला होत्या. प्रवीणची सरावात चूक झाली, तंत्र चुकले किंवा एखाद्या स्पर्धेत खराब कामगिरी झाली तर योंद्री त्यानेच शिकविलेल्या शब्दांचा वारेमाप वापर करीत असे. प्रवीणने ही बाब अतिशय सकारात्मक घेत आपले तंत्र अधिक पक्के करण्यास सुरुवात केली होती. त्याचा फायदा असा झाला की त्याने एकविसाव्या वर्षीच १७ मीटरचा पल्ला पार केला.

आंतरराज्य स्पर्धेत त्याने १७.१८ मीटर उडी घेत स्वतःचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. योंद्री यांच्यापूर्वी फ्रेन्च प्रशिक्षक अँटनी येंच यांच्याकडे तिहेरी उडीचे धड घेतले. प्रवीण एका मुलाखतीत म्हणतो, योंद्री आणि येंच यांच्या प्रशिक्षणात मूलभूत फरक होता. येंच प्रामुख्याने गती वाढवून अधिकाधिक सफाईदार उडीसाठी प्रयत्नशील असायचा. योंद्री मात्र स्वतःच्या क्षमतांचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी प्रयत्नशील होता. या दोन्ही मुद्द्यांवर प्रवीणने अपार मेहनत घेतली आहे. आता तो आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सज्ज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT