The River Was Empty Here During The Week! Kolhapur Marathi News
The River Was Empty Here During The Week! Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

येथे आठवड्यात होते नदी रिकामी! 

अजित माद्याळे

गडहिंग्लज : चित्री मध्यम प्रकल्पामुळे हिरण्यकेशी नदी बारमाही दुथडी वाहते. यंदा तशी पाण्याची स्थिती चांगली आहे; परंतु निलजी बंधाऱ्याच्या पूर्वेकडील नदीपात्र काठोकाठ भरलेले असले, तरी अवघ्या आठवड्यातच नदी रिकामी केली जाते. पात्रातून चालत जाण्यासारखी परिस्थिती तयार होते. सिंगल फेज आणि उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक अश्‍वशक्तीच्या पंपामुळे सुरू असलेला उपसा, हे यामागचे कारण आहे. परिणामी प्यायलासुद्धा पाणी कमी पडते. 

यंदा पाण्याची स्थिती चांगली असल्याने निलजी बंधाऱ्यापर्यंत पहिल्या दोन आवर्तनासाठी उपसाबंदी नव्हती. निलजी बंधाऱ्याखाली मात्र 10 दिवस उपसा व 20 दिवस बंदीची कार्यवाही सुरू आहे. प्रत्येक आवर्तनावेळी निलजी ते कडलगेच्या खोत बंधाऱ्यापर्यंत अर्ध्याहून अधिक नदीपात्र तुडुंब असते; परंतु पाणी आपल्या पंपाच्या फुटबॉलला आल्याचे कळताच शेतकरी बटन मारतात. 

सर्वाधिक पंप सिंगल फेजचे असल्याने रात्रंदिवस पाण्याचा उपसा सुरू असतो. याशिवाय पाणी कमी आणि उपसा अधिक अशी परिस्थितीत निलजीच्या पूर्वेकडील दोन्ही बाजूच्या नदीकाठाची आहे. उपसा दहा दिवसांचा असला तरी सात ते आठच दिवसांत नदीपात्र कोरडे ठाक पडलेले असते. यामुळे पुढे खोत बंधाऱ्यापर्यंत पाणी जाण्यास लागणारा उशीर आणि पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. उर्वरित वीस दिवस पुढील आवर्तनापर्यंत लोकांना पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाटबंधारे खात्याने याबाबत नियोजन करण्याची गरज आहे. 

65 कि. मी.चा पाण्याचा प्रवास 
चित्री ते निलजी बंधाऱ्यापर्यंत नदीपात्राचे अंतर 58 ते 60 कि.मी. इतके आहे. प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर हे अंतर अवघ्या पाच ते सहा दिवसांत तुटते. तर निलजी ते कडलगेपर्यंतचे अंतर केवळ पाच ते सहा किलोमीटर असूनही हे अंतर तुटण्यासही तितकाच कालावधी लागतो. यावरून या दरम्यानचा उपसा किती आहे, याचा अंदाज येतो. कोरडे पडणारे पात्र, आवर्तन सुरू असतानाच चोरून होणारा उपसा ही महत्त्वाची कारणे यामागची आहेत. चौथाई मोठ्या प्रमाणात असल्याने मोठ्या अश्‍वशक्तीचे पंप जास्त आहेत. यामुळे अधाशासारखे पाणी उपसले जात आहे. 

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT