Kolhapur  sakal
कोल्हापूर

Kolhapur : डेपोतील कचरा रस्त्यावर

मोरेवाडीतील चित्र; तातडीने उपाययोजनांची मागणी

- प्रकाश पाटील

कंदलगाव : वाढणाऱ्या नागरी वस्त्या, कॉलन्यांमुळे दोन-दोन घंटागाड्या रोज फिरत असूनही रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कचऱ्याची पिशवी डेपोत न टाकता रस्त्याकडेला फेकली जाते. यामुळे कचरा डेपोत कमी आणि रस्त्यावर जास्त दिसत आहे. चार दिवस पडून राहिलेल्या कचऱ्यातील दुर्गंधीने प्रवासी व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

कंदलगाव मुख्य रस्त्यावर कचरा डेपो असून त्यामध्ये दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग वाढल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. डंपिंग परिसर माळावर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर वारे वाहत असल्याने डंपिंगमधील प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा वाऱ्यामुळे परिसरात पसरत असल्याने स्थानिकांना त्रास होत आहे.

संबंधित मोरेवाडी ग्रामपंचायतीने रस्त्याकडेला पसरलेला कचरा डेपोत टाकावा, अशी मागणी होत आहे.

वीस कॉलनीतील कचरा

मोरेवाडी परिसरातील वीस कॉलनीतून कचरा गोळा करून येथे टाकला जातो. कचरा डेपोसाठी मुबलक जागा असूनही घाईगडबडीत कचरा टाकून पळ काढला जातो. प्रशासनाने योग्य नियोजन करून कचरा डंपिंगसाठी सूचना द्याव्यात.

डंपिंग परिसरात बेघर वसाहत,आरटीओ सर्कल व भारती विद्यापीठसारखे महाविद्यालय असल्याने हा परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे. पसरलेला कचरा एकत्र करणे गरजेचे आहे.

- राजेंद्र सुतार, प्रवासी

संबंधित ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना समज दिली आहे. दोन दिवसांत कचरा एकत्र करून डेपोत टाकण्यात येईल.

- रूपाली बाजारी, सरपंच मोरेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पप्पू यादवांचा पुजाऱ्याचा वेष अन् राहुल गांधींची श्रद्धाळूची भूमिका; संसदेतील 'त्या' प्रकारावर लोकसभा अध्यक्ष नाराज

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Pune Cyber Crime: सायबर गुन्हेगारांना चाप! पुणे पोलिसांच्या डिजिटल कारवाईत 845 पोस्ट हटवल्या, 132 गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT