The road to Jyotiba was opened to traffic 
कोल्हापूर

जोतिबावरील "तो' रस्ता वाहतुकीस खुला झाला; पण 

निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर  : जोतिबा-कोल्हापूर या मुख्य मार्गावरील पाण्याचा टाका परिसरात गेल्यावर्षी पावसाळ्यात तुटलेला रस्ता यंदा नव्याने व दर्जेदार केला असून, या कामासाठी सुमारे दोन कोटी खर्च आला. हा रस्ता अगदी नेटका, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाला. आता तो वाहतुकीस खुला झाला तरी त्याचे भवितव्य येथील निसर्गावरच अवलंबून आहे

 
येथे उंच डोंगर माथे असून, सतत पावसाची रिपरिप दाट धुके व जोरदार वाऱ्याचा सामना या परिसराला सहन करावा लागतो. गेल्यावर्षी पाण्याचा टाका परिसरातील रस्ता जुलै-ऑगस्टच्या दरम्यान जोरदार अतिवृष्टीमुळे 250 मीटर अंतर रस्ता पूर्णपणे तुटून गेला. परिणामी जोतिबा डोंगराला जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजे गायमुख तलाव मार्गावरील नागमोडी रस्त्याने सुरू झाली. पावसाळ्यात तज्ज्ञांनी रस्त्याला भेट देऊन अभ्यास केला. 
केंद्र सरकारच्या पुरहानी योजनेतून तातडीने दोन कोटी रुपये मंजूर केले. त्यानुसार तातडीने काम सुरू झाले.

पन्हाळा उपअभियंता बी. एल. हजारे, शाखा अभियंता पुजारी, एक्‍झिट इंजिनियर प्रविण जाधव यांनी मार्गदर्शन केल्यामुळे रस्त्याचे काम पूर्णत्वास आले. ठेकेदारांनी रस्ता पूर्ण केला तरी त्यांची बिले मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ठेकेदार काशीद यांनी या रस्त्याच्या कामावर एक रोड लोलर व एक मशिन सज्ज ठेवले आहे. पावसाने रस्ता बसेल तसा किरकोळ कामे केली जाणार आहेत. 

जोतिबावरील पाण्याचा टाका हा रस्ता दर्जेदार केला आहे. यापुढे या रस्त्याचे भवितव्य निसर्गाच्या हातात आहे. आदेशानुसार चैत्रयात्रेपूर्वी रस्ता पूर्ण केला आहे. तो वाहतुकीस खुला केला आहे. 
शिवाजी काशीद, ठेकेदार 

तुटलेल्या रस्त्याबाबत मी पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन दिले होते. त्यानुसार या रस्त्याच्या कामाला गती आली. सध्या हा रस्ता चांगला झाला आहे. 
मधुकर रामाणे, माजी नगरसेवक, कोल्हापूर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT