The roads of Canaan were sealed 
कोल्हापूर

कनाननगरचे रस्ते केले सील 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः कनाननगर झोपडपट्टीतील तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच महापालिका प्रशासनाने तत्परता दाखवत औषध फवारणी केली. त्याचबरोबर सर्व रस्ते सील केले. कनाननगरात रुग्ण सापडल्याने कनाननगरसह आजूबाजूच्या ताराबाई पार्क, नागाळा पार्क, न्यू शाहूपुरी व लगतच्या परिसरातही नागरिकांत घबराट पसरली आहे. हा परिसरही रात्री उशिरा सील करण्यात आला. तथापि, प्रशासनाने येथे प्रबोधनात्मक काम सुरू करून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले जात आहे.

कनाननगर येथील तरुणाच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला. महापालिकेने तातडीने उपाययोजना करायला सुरवात केली. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या एका पथकाने लाऊडस्पिकरद्वारे लोकांना घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन केले. कनाननगर ही झोपडपट्टी दाटीवटीने वसली आहे. लोकसंख्या सुमारे दहा हजारांवर आहे. पत्र्याची आणि मातीची घरे, झोपड्या आहेत. त्यामुळे येथे या आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रशासनाला आता कष्ट करावे लागणार आहेत. सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्यापासून ते औषध फवारणी करण्यापर्यंत प्रशासनाला काम करावे लागणार आहे. 
पालिकेच्या आरोग्य विभागाचे एक पथक तातडीने औषध फवारणी करण्यासाठी तेथे गेले. सायंकाळी साडेसातनंतर औषध फवारणी करायला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत येथे औषध फवारणी केली जात होती. 

परिसर सील 
रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच उमेदपुरी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्कपासून कनाननगरकडे जाणारा रस्ता, अर्बन बॅंक, वायल्डर मेमोरियल चर्चपासून कनाननगरकडे जाणारा रस्ता तसेच इतरही अनेक लहान-मोठे असे सुमारे बाराहून अधिक ठिकाणचे रस्ते तातडीने बंद केले. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

SCROLL FOR NEXT