Rohit says physical disability can't hinder your progress, read why

कोल्हापूर

रोहित म्हणतो शारीरिक व्यंग तुमच्या प्रगतीत आड येऊ शकत नाही, का ते वाचा

संदीप खांडेकर

कोल्हापूर : रामानंदनगर परिसरातल्या गुरुकृपा कॉलनीतला रोहित राजेंद्र राबाडे चार भिंतींत जगतो. कुशल शिल्पकार, ओबडधोबड दगडातून जशी मूर्ती घडवतो, त्याप्रमाणे आयुष्याला आकार देण्यात तो भारी ठरलाय. ऑनलाईन फूड सप्लायरच्या व्यवसायात त्याने चांगलाच जम बसवलाय. संचारबंदीतही त्याच्या व्यवसायाला "ब्रेक' मिळाला नाही. जन्मत:च दिव्यांग असूनही सहानुभूतीला नाकारून स्वाभिमानाने जगणारा हा व्यवसाय वेडा तरुण आहे. संचारबंदीत नोकरी गमावल्याने नैराश्‍येच्या गर्तेत अडकलेल्यांसाठी त्याचे आयुष्य प्रेरणादायी ठरू शकेल.

सत्तावीस वर्षीय रोहित जन्मत:च दिव्यांग असल्याने व्हीलचेअर त्याची सोबती आहे. वडील राजेंद्र शिरोली "एमआयडीसी'त काम करून रिक्षा चालवितात. रोहित त्यांचा थोरला मुलगा. त्याचे लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरात सातवी, तर नूतन मराठी विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण झाले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्याने बी.ए.ची पदवी मिळवली. ऍनिमेशन ग्राफिक्‍सचा कोर्सही त्याने पूर्ण केला. प्रोजेक्‍ट तयार केल्यावर तो दाखविण्यासाठी एखाद्या ठिकाणी जाणे त्याला शक्‍य नव्हते. 
त्याने नव्या व्यवसायात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. शोभेचे पक्षी, रॅबिट व फिशसाठी लागणारे फूड पुरविण्याच्या व्यवसायात तो उतरला. चेन्नई, बंगळूरमधून रॉ मटेरियल खरेदी करून त्याने घरातच फूड पॅकेट्‌स करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने फूडचा ब्रॅंड रजिस्टर केला. ऑनलाईन विक्री करण्यात अग्रगण्य असणाऱ्या दोन कंपन्यांशी त्याने करार केला आहे. त्या कंपन्यांचे कर्मचारी त्याच्या घरातून फूड पॅकेट्‌स घेऊन जातात. 
रोहित म्हणतो, ""शारीरिक व्यंग तुमच्या प्रगतीत आड येऊ शकत नाही. तुम्ही सकारात्मक राहिलात तर तुमचे आयुष्य बदलू शकते. तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकता.'' 

कुटुंबीयांची मदत 
संचारबंदीत रोहितच्या फूड पॅकेट्‌सना मागणी होती. वडिलांचा रिक्षा व्यवसाय बंद राहिला असताना त्याने घरची जबाबदारी सांभाळली. रोज किमान 20 हून अधिक फूड पॅकेट्‌स विक्री होतात. फूड पॅकेट्‌स बनविण्याचे काम त्याचे आई, वडील व शेजारील महिला करतात. 

चौकट 

कोट - 
माझा मुलगा स्वाभिमानी आहे. दिवसभर घरात बसून तो ऑनलाईन व्यवहार करतो. त्याची फसवणूक करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. तो अभ्यासू असल्याने त्याने त्यांना चांगलाच धडा शिकवला. घरखर्चाचा भारही तो उचलतो. 
- राजेंद्र राबाडे 

संपादन - यशवंत केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT