The Roof Blown Off, With The Cradle, The Baby Is Safe Kolhapur Marathi News  
कोल्हापूर

वादळी वाऱ्यात पाळण्यासह छप्पर उडाले अन्...

अशोक तोरस्कर

उत्तूर : दुपारी एक वाजता जोशी कुटुंब जेवण करून आपल्या घरात निवांत बसले होते. तीन माहिन्यांचे बाळ पाळण्यात होते. अचानक बाळ रडू लागले. मुलाची आई बाळाला पाळण्यातून काढून जमिनीवर बसून त्याला खेळवू लागली. अचानक वादळी वाऱ्याला सुरवात झाली. बघता बघता वारा जोशींच्या घरात शिरला. डोळ्यांदेखतच आड्याला बांधलेला पाळणा छपरासह उडून गेला. काळजात धस्स... करणारी ही घटना आरदाळ (ता. आजरा) या गावात घडली. या घटनेत बाळ सुखरूप राहिले; पण सुमन बाजीराव जोशी या गरीब विधवा महिलेच्या बेघर योजनेतून वर्षभरापूर्वी बांधलेल्या घराचे मोठे नुकसान झाले. 

सुमन जोशी या विधवा आहेत. आपला अपंग जावई, मुलगी व दोन नातू यांच्यासह या घरामध्ये राहतात. जावई नेताजी साठे हे एका हाताने अपंग आहेत, तर मुलगी चंद्रभागा ही बाळंतीण आहे. एक नातू सात वर्षांचा, तर दुसरा तीन महिन्यांचा. सुमन जोशी यांचे हे कुटुंब अतिशय गरीब असून ते मिळेल ती मोलमजुरी करून उपजीविका करते.

 सध्या लॉकडाउनमुळे त्यांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वर्षभरापूर्वी त्यांना शासनाने बेघर योजनेतून घर बांधून दिले. मात्र, वादळी वाऱ्याने छप्पर उडून गेले. आता या घरावर पुन्हा छप्पर कसे घालायचे, त्यासाठी येणारा खर्च कसा करायचा, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. सध्या ते छप्पर नसलेल्या घरातच राहतात. मात्र पावसाला सुरवात होणार असल्याने उघड्यावर कसे राहायचे हा प्रश्‍न आहे. या हताश व निराधार कुटुंबाला घराचे छप्पर दुरुस्त करण्यासाठी समाजातील दानशूर व सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन शिवाजी गुरव यांनी केले आहे. 

संकटांची मालिका 
सुमन जोशी या विधवा महिला आपल्या दोन मुलीसह राहतात. एका मुलीच्या पतीचे तीन महिन्यांपूर्वी अपघातात निधन झाले. दुसऱ्या जावयाचा उसाच्या रस काढणाऱ्या मशिनमध्ये हात सापडला. ते एका हाताने कायमच अपंग झाले. आता घराचे छप्पर उडून गेले.

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: कर्जाच्या डोंगरामुळे तरुण शेतकऱ्याने दिला जीव

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT