कोल्हापूर : ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय, जो कोणी ब्राह्मण समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेईल, त्यांना मदत केली जाईल, असा निर्णय कोल्हापूर येथे झालेल्या गोलमेज परिषदेत घेण्यात आला होता. मात्र, भाजपने या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत ब्राह्मण समाजाचा रोष ओढवून घेतला आहे, असा दावा ब्रह्म महाशिखर परिषदेचे मकरंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला.
या वेळी विजय जमदग्नी, प्रदीप अष्टेकर, दिलीप धर्माधिकारी, कमलाकर देशपांडे, प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, सूरज कुलकर्णी उपस्थित होते.
श्री कुलकर्णी म्हणाले, ‘‘ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत आम्हाला गृहीत धरू नये, असे सांगूनही भाजपच्या नेत्यांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे नाराज ब्राह्मण समाजातील मतदारांनी ठरवल्यानेच विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या परंपरागत मतदारसंघात त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला, ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासह अन्य मागण्या आम्ही करीत असूनही मागच्या पाच वर्षांत सत्तेत असताना भाजप सरकारने समाजासाठी काहीच केले नाही.
भाजपच्या नेत्यांनी मागण्यांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर मेधाताई कुलकर्णी यांची आमदारकी हिरावून घेतली. मिलिंद संपगावकर, शेखर चरेगावकर यांना केवळ ब्राह्मण म्हणून उमेदवारी नाकारली.’’ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम असून, त्यांनीही समाजाची फसवणूक केली. यापुढेही कोल्हापूरसह पुणे, औरंगाबाद महापालिकेत समाजाला दुखावल्याचे परिणाम पाहायला मिळतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.