० 
कोल्हापूर

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात 23 ला गोलमेज परिषद 

युवराज पाटील

कोल्हापूर : मराठा आरक्षणासंबंधी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी (ता. 23)ला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. साने गुरुजी वसाहतीमधील रावजी मंगल कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता परिषदेस सुरवात होईल. राज्यभरातील पन्नास मराठा संघटनांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी होतील, असेही ते म्हणाले. 

सुरेश पाटील म्हणाले, ""मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणामध्ये असंतोष आहे. ज्या मागणीसाठी 23 वर्षांपासून संघर्ष केला, त्यालाच स्थगिती मिळाल्याने आमच्या पदरी निराशा पडली. मराठा समाजातील मुला-मुलींचे शिक्षणाचे, तसेच नोकरीचे दरवाजे बंद झाले आहेत. आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आंदोलनाची नेमकी दिशा ठरविण्यासाठी गोलमेज परिषद होत आहे. त्यात मराठा संघटना, वकील, ज्येष्ठ इतिहास संशोधकांची मते ध्यानात घेऊन दिशा निश्‍चित होईल. शासनाला अल्टिमेटम दिला जाईल. नंतर आंदोलनाशिवाय पर्याय असणार नाही.'' 

आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत शासनाने मुली-मुलींचे शैक्षणिक शुल्क भरावे, "सारथी'साठी पाचशे कोटींची तरतूद करावी, आरक्षणाच्या आंदोलनात ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख अनुदान देण्यासंबंधी कालावधी निश्‍चित करावा, जिल्ह्यात मराठा वसतिगृह उभारावे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम लवकर सुरू करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, असेही पाटील यांनी नमूद केले. भरत पाटील, दिग्विजय मोहिते, भास्कर जाधव, प्रा. चंद्रकांत भराट, जयदीप शेलखे, शिवाजी लोंढे, दादासाहेब देसाई, सचिन साठे उपस्थित होते. 

...तर लोकप्रतिनिधींविरोधातही आंदोलन 
संसदेचे अधिवेशन सुरू आहे. मराठा खासदारांनी आरक्षणासंबंधी नेमके काय करता येईल, याबाबत पत्र तातडीने द्यावे. राज्यातील मराठा आमदारांनीही ठोस भूमिका जाहीर करावी. तसे न झाल्यास त्यांच्या मतदारसंघात आंदोलन केले जाणार असल्याचे समितीचे समन्वयक विजय महाडिक यांनी सांगितले. घराणेशाहीच्या राजकारणामुळे गरीब मराठ्यांचे नुकसान होत आहे. श्रीमंत, पण मराठा असलेल्या आमदारांचे राजकारण खपवून घेणार नाही. प्रसंगी गनिमी काव्याने आंदोलनाचाही इशारा त्यांनी दिला. 
 
संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT