The RTO Has No Place In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला खासगी जागेतच चालकांची "ट्रायल'

अजित माद्याळे

गडहिंग्लज : गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालक परवाना, वाहन नोंदणीसाठी आरटीओ विभागाकडून शिबिर होते. परंतु, त्यांना त्यासाठी हक्काची जागा आजअखेर मिळालेली नाही. परिणामी कडगाव रस्त्यासह खासगी जागेतच परवान्यासाठी चालकांची ट्रायल घ्यावी लागते. रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांमुळे शिबिरादिवशी शासकीय विश्रामगृह परिसरात तोबा गर्दी पहायला मिळते. यामुळे आरटीओ शिबिराला हक्काची जागा कधी मिळणार, हा प्रश्‍न प्रत्येक शिबिरावेळी वाहनधारकांना पडतो. 

गडहिंग्लज हे उपविभागाचे ठिकाण आहे. चालक परवाना, नव्या वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांचे नूतनीकरण आदी कामासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगडमधील वाहनधारकांना कोल्हापूरला जावे लागायचे. वाहनधारकांची संख्या वाढू लागल्याने त्यांच्या सोयीसाठी काही वर्षापासून येथे आरटीओंचे शिबिर होते. सुरूवातीला महिन्यातून एकदा होणारे हे शिबिर वाढत्या वाहन संख्येमुळे प्रत्येक आठवड्यातील शुक्रवारी होत आहे. उपविभागातील तिन्ही तालुक्‍यांसह कागलमधील बहुतांशी वाहनधारक शिबिरासाठी येथे दाखल होतात. 

सध्या शिबिर शासकीय विश्रामगृह परिसरात होते. कार्यालयीन कामकाजासाठी संगणक व इतर साहित्य कार्यान्वित करण्यास विश्रामगृहातील एक खोली वापरली जाते. शिकाऊ व पक्‍क्‍या परवान्याच्या ट्रायलसाठी मुबलक जागा नसल्याने शिवराज महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रोडवरील एका कोपऱ्यात आणि मुख्य रस्त्यावर ही कार्यवाही करावी लागते.

तसेच चालक परवाना, वाहन नोंदणी, जुने वाहन नूतनीकरण, वाहनांची फेरफार नोंदणी आदीसाठी येणारी वाहने मुख्य नागनवाडी-गारगोटी रोडच्या दुतर्फा लागलेली असतात. यामुळे शिबिरादिवशी वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. प्रत्येक आठवड्याला सरासरी 300 हून अधिक वाहने परवाना काढण्यासाठी येथे येतात. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे जागेअभावी यंत्रणेची पंचाईत होते. यामुळे शिबिरासाठी आता हक्काची जागा आवश्‍यक आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. 

व्यापक जागेची गरज
वाहनधारकांची संख्या वाढू लागल्याने सध्याची गडहिंग्लजमधील जागा अपुरी आहे. चालकांचे ट्रायल सार्वजनिक रस्ता व खासगी जागेत घ्यावे लागते. शिबिरातील कामकाजाचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच चालल्याने स्वतंत्र व व्यापक जागेची गरज आहे. 
- रमेश सरनाईक, मोटार वाहन निरीक्षक कोल्हापूर 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT