Rugby's step towards de-pollution of Diwali; determination not to play firecrackers 
कोल्हापूर

दिवाळी प्रदूषणमुक्तीसाठी "रग्बी'चे पाऊल  ; फटाके न वाजविण्याचा निर्धार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : "सकाळ' आणि प्रशासनाच्या प्रदूषणमुक्त दिवाळी करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा रग्बी असोसिएशनने यंदा दिवाळीला फटाके न वाजविण्याचा निर्धार केला. तसे लेखी पत्र असोसिएशनने जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांना दिले. या वेळी असोसिएशनचे पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते. 
"सकाळ'ने यंदाच्या वर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. प्रशासनानेही प्रदूषणमुक्तीचा नारा दिला आहे. 
या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनने यंदाची दिवाळी फटाकेमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्याचा निर्णय घेतला. 
कोरोनाचा वाढता संसर्ग, तसेच मानवीय प्रदूषणामुळे वातावरणात होणाऱ्या घातक बदलामुळे मानव जबाबदार राहतो. 
यामुळे असोसिएशनने फक्त दिवाळीच नाही तर वर्षभर वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी डॉ. साखरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. प्रा राहुल लहाने यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, सचिन चव्हाण, जमादार, रग्बी प्रशिक्षक दीपक पाटील, श्रीधर निगडे, पृथ्वीराज पाटील, नीलम पाटील, पूजा कुंभार, कल्याणी पाटील, वैष्णवी पाटील, सायली पाटील, सानिका पाटील, स्वाती माळी, विनायक पवार, संकेत पाटील, गणेश मिसाळ, रोहित मुद्राळे, किरण मोरबाळे, करण शिंदे, सोमेश खाडे आदी उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT