run away corona positive from cpr hospital kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग - 'तो' कोरोना पॉजिटीव्ह कोल्हापूरच्या सी.पी.आर रुग्णालयातून पळाला अन् रिक्षाने थेट.....

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी - शहरात काल रात्री कोरोना पॉझिटिव्ह आलेला यंत्रमाग कामगार उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल असताना आज दुपारी तेथून पळ काढला आहे. हा कामगार थेट रिक्षा करून आपल्या घरीच आल्याने इचलकरंजीतील कुडचे मळा परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

शहरातील कुडचे मळा परिसरात राहणारा हा 55 वर्षाचा नागरिक यंत्रमाग कामगार आहे. तो अनेक ठिकाणी यंत्रमागावरही काम केला आहे. त्याचबरोबर त्याच्या घरातील 9 व्यक्ती एकत्र राहतात. यामुळे अगोदरच या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळी पुन्हा दोन नवे रूग्ण सापडल्याने शहरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले. असे असताना काल रात्री पॉझिटिव्ह आलेला यंत्रमाग कामगार चक्क सीपीआर रूग्णालयातून सर्वाना चकवा देत पळ काढला.

तेथून तो रिक्षा करून थेट इचलकरंजी गाठला. वास्तविक उपचारार्थ दाखल असलेला हा रूग्ण अचानकच कुडचे मळा परिसरातील घरात आला आणि नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांची एकच भांबेरी उडाली. प्रशासनाला ही माहिती समजताच तातडीने त्या भागात अधिकारी दाखल झाले आहेत. एकूणच या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahapalika Election: सर्वात मोठी बातमी! 'या' प्रभागातील निवडणूकीला न्यायालयाची अंतरिम स्थगिती, मतदान कधी होणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

Madhav Gadgil: ‘नीरी’ला कटू सत्याची करून दिली आठवण; पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण अहवालातील त्रुटी केल्या होत्या उघड!

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT