Rural Development Minister Hasan Mushrif criticism on BJP kolhapur political marathi news 
कोल्हापूर

'सध्या सर्वत्र चर्चेत असलेले परमबीर सिंह हे आता भाजपचे डार्लिंग'

सदानंद पाटील

कोल्हापूर :भाजप मिडीया सेलचे प्रमुख नवीनकुमार जिंदल यांनी पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर चुकीचे आरोप केले आहेत. खा.पवार यांच्या आजारपणाचा व वाझे प्रकरणाचा संबंध जोडून जी काही वक्‍तव्ये केली आहेत याचा मी निषेध करतो. तसेच भारतीय जनता पक्षाने जर दोन-तीन दिवसात याप्रकरणी दिलगिरी व्यक्‍त केली नाहीतर अशाच प्रकारची वक्‍तव्ये राष्ट्रवादीकडून केली जातील. भाजपला याप्रकरणी मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. जिल्हा बॅंकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मुश्रीफ म्हणाले, खा.पवार आजारी पडल्यानंतर त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनीही विचारपूस केली होती. मात्र जिंदाल यांच्या वक्‍तव्यावर कोणीही दिलगिरी व्यक्‍त केलेली नाही. मोदी, शहा हे पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या मागे लागल्याने ते व्यस्त असल्याचे आपण समजू शकतो. मात्र फडणवीस हे विविध विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देतात. त्यांनी या विषयावर बोलणे आवश्‍यक होते मात्र त्यांनीही हा विषय गांभीर्यान घेतलेला नाही. त्यामुळे दोन दिवसात फडणवीस यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्‍त करावी,अशी मागणी .मुश्रीफ यांनी केली. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत पत्रकार परिषदा घेतात. मग या विषयावर त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? त्यांनी ताबडतोब यावर प्रतिक्रिया द्यावी, अन्यथा त्यांना या सर्वाची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही.मुश्रीफ यांनी यावेळी दिला. यावेळी मुश्रीफ यांनी जिंदाल यांच्यावरही जोरदार टिका 
केली. कोण हा जिंदाल? पवार साहेबांवर बोलताना त्याला लाज वाटत नाही का? भाजपचा हा सर्व प्रकार ठरवून सुरु असल्याची टीकाही मुश्रीफ यांनी यावेळी केली. 

 परमबीर सिंह भाजपचे डार्लिंग 
सध्या सर्वत्र चर्चेत असलेले आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे भाजपचे डार्लिंग झाले आहेत. त्यांना माफीचा साक्षीदार करण्याचा संशय आपण यापुर्वीच व्यक्‍त केला असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच अंबानींच्या बंगल्याबाहेर ठेवण्यात आलेल्या जिलेटिन कांड्याचे जे प्रकरण आहे त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही ना.मुश्रीफ यांनी यावेळी केली.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT