Rural Development Minister Hasan Mushrif informed today that a state level study group has been appointed 
कोल्हापूर

महिलांनो मायक्रो फायनान्स कंपनीत कर्ज घेऊन अडकला आहात..? तुम्हाला होईल मदत राज्यस्तरिय अभ्यासगटाची

संदीप खांडेकर

कोल्हापूर : ग्रामीण भागातील सुक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या (मायक्रो फायनान्स कंपन्यां) कर्ज चक्रव्युहात अडकलेल्या महिलांना बाहेर काढून त्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी एक राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. अभ्यासगट पुढील तीन महिन्यात अभ्यास करुन किमान अंतरीम अहवाल सादर करणार असून, या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

श्री. मुश्रीफ म्हणाले,"राज्यात ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटातील महिलांना बॅकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अनेक महिला सुक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून कर्ज घेतात, असे निदर्शनास आले आहे. संस्थांच्या कर्ज चक्रव्युहात महिला हळहळू अडकत जातात व त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम होता. त्याचा अभ्यास करण्यासाठी व महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सूचविण्यासाठी  राज्यस्तरीय अभ्यास गट स्थापन करण्यात आली आहे."

ते म्हणाले,"महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत निर्माण झालेल्या स्वयंसहाय्यता गटातील महिला सूक्ष्म वित्त पुरवठा करणा-या संस्थांचे कर्ज घेऊन त्यांच्या चक्रव्युहात अडकल्या आहेत किंवा कसे याचा सखोल अभ्यास करणे, सुक्ष्म वित्त पुरवठा करणा-या संस्थांकडून महिलांनी कर्ज घेण्याची कारणे, व्याजाचा दर, कर्ज वितरणाची पध्दती, कर्जाचा वापर, कर्ज वसुली पध्दत, कर्ज वसूली वेळेवर न होण्याची कारणे या सर्व बाबींचा ग्रामीण महिलांच्या आयुष्यावर होणा-या परिणामांचा अभ्यास केला जाईल.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची व्याप्ती, अभियानयाची यशस्वीता, गटांच्या उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध होते किंवा कसे, विपणनाची पध्दत याबाबत अभ्यास करणे, अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या सुचविणे यावर समिती काम करेल." दरम्यान, हा अभ्यासगट हा फक्त महिलांच्या आर्थिक अडचणी, त्यावर उपाययोजना यासाठी असून मायक्रोफायनान्सच्या कर्जमाफीसाठी नाही, असे शासन निर्णयात म्हटले आहे.


अभ्यासगट असा :  जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा (अध्यक्ष), भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी एस, धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वनमती सी, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखर (सदस्य), 
 लक्ष्य प्रतिष्ठानच्या (अमरावती) अध्यक्ष सुरेखा ठाकरे, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्ष (राजगुरुनगर, जि. पुणे) विजयाताई शिंदे, लोकप्रतिष्ठानच्या (उस्मानाबाद) सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, स्वयंसिद्धाच्या (कोल्हापूर) संचालिका कांचन बाळकृष्ण परुळेकर (अशासकीय सदस्य), उमेद अभियानाच्या अतिरिक्त संचालक मानसी बोरकर (सदस्य सचिव)

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT