rural development minister hasan mushrif press conference kolhapur 
कोल्हापूर

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आधीच फेटाळण्याचं फिक्स; मुश्रीफांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

सदानंद पाटील

कोल्हापूर : राज्यपाल नियुक्‍त विधान परिषदेच्या 12 जागांसाठीच्या नावांची शिफारस राज्य मंत्रीमंडळ करणार आहे. मात्र मंत्रीमंडळाने दिलेली ही नावे बाजुला ठेवण्याबाबत राज्यपाल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असल्याचे वक्‍तव्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एका खाजगी कार्यक्रमात केल्याचा गौफ्यस्फोट राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक भैय्या माने उपस्थित होते. 

ना.मुश्रीफ म्हणाले, माजी मंत्री,आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. यावेळी आ.कोरे यांचे सांत्वन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील व जिल्हा बॅंकेचे संचालक भैय्या माने गेले होते. या ठिकाणी काही वेळातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील दाखल झाले. सांत्वन केल्यानंतरच पाचच मिनिटात त्यांनी राज्यपालांकडून निवडलेल्या विधानपरिषदेच्या 12 सदस्यांबाबत धाडसी वक्‍तव्य केले.

मंत्रीमंडळाने जरी 12 नावांची शिफारस केली तरी ही नावे बाजुला ठेवण्याबाबत राज्यपाल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे आ.कोरे तुम्ही काही काळजी करु नका, असा सल्ला यावेळी आमदार पाटील यांनी दिला असल्याचा गौफ्यस्फोट ना. मुश्रीफ यांनी केला. मात्र काहीवेळाने आमदार पाटील यांना या ठिकाणी भैय्या माने उपस्थित असल्याचे ध्यानात आल्यानंतर त्यांनी सारवासारव केल्याचेही ना.मुश्रीफ यांनी सांगितले. 

ना. मुश्रीफ म्हणाले, भाजपकडून चाललेले राजकारण हे अत्यंत घातक आहे. आ.पाटील यांनी केलेल्या वक्‍तव्याचा राज्यातील जनतेने गांभीर्यान विचार करणे आवश्‍यक आहे. अशा पध्दतीने निवडी व्हाव्या लागल्या तर काही खरे नाही, असा टोलाही ना.मुश्रीफ यांनी यावेळी लावला. तसेच भाजपची नेते मंडळी राज्यपालांना अडचणीत आणत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयाला खो घालण्याचे काम ते राज्यपालांच्या माध्यमातून करत आहेत. राज्य शासनाचे सर्व निर्णय आडवले जात आहेत. अध्यादेश परत पाठवले जात आहेत. महत्वाच्या बिलांवर सह्या होत नसून जनतेनेच आता या सर्वाचा विचार करावा, असे आवाहन ना.मुश्रीफ यांनी केले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT