Doctors  sakal
कोल्हापूर

डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करतो!

गुणांच्या आधारे भारतात प्रवेश पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांचा अधिक ओढा

अजित झळके

सांगली : नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने डॉक्टर व्हायचे स्वप्न अधुरे राहण्याची भीती वाटणाऱ्यांना युक्रेनची विद्यापीठे साद घालतात. काही करून मला डॉक्टरच व्हायचे आहे, असा इरादा बाळगणारी मुले मग युक्रेनसह जॉर्जियासारख्या देशांची निवड करतात. भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत अतिशय कमी गुणांवर तेथे प्रवेश मिळतोच, शिवाय इथल्या खर्चाच्या तुलनेत निम्म्या पैशांमध्ये डॉक्टर होता येते. फक्त चार वर्षे देशाबाहेर राहण्याची तयारी असावी लागते.

रशियाने युक्रेनवर हल्ला करून युद्ध सुरू केल्याने हा देश जगाच्या नकाशावर चर्चेत आला. या देशात भारतातील शेकडो मुले अडकली आणि त्यातील बहुतांश ही वैद्यकीय शिक्षण घेणारीच आहेत. त्यातही ९० टक्क्यांवर मुले एमबीबीएस करायला गेली असून, हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मुलांना पशुवैद्यकीय शिक्षणाचा पर्याय निवडला आहे, अशी माहिती वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील तज्ज्ञ डॉ. विकास मगदूम यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

डॉ. मगदूम सांगतात, ‘‘भारतात ७२० गुणांची नीट परीक्षा होते. बारावी विज्ञाननंतर ही परीक्षा द्यावी लागते. त्यात खुल्या गटातील मुलांना प्रवेश सुलभ व्हायचा असेल, तर किमान ५५० ते ६०० गुण मिळावे लागतात; तरच एमबीबीएसची पायरी चढता येते.आरक्षित प्रवर्गांसाठी किमान ३५० पेक्षा जास्त गुण मिळवावे लागतात. इथे इतके गुण मिळवू न शकणारी मुले मग विदेशातील संधी शोधतात. त्यात युक्रेनचा थोडा वरचा नंबर लागतो. भारतात या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च मोठा आहे. युक्रेनमध्ये सुमारे २० लाख रुपयांत चारही वर्षांचे शिक्षण पूर्ण करता येते. इतर खर्च वाढलाच तरी ३० लाखांहून अधिक रक्कम खर्चावी लागत नाही.

भारताच्या तुलनेत विदेशातील परीक्षा पद्धती सोपी आहे. टर्मनुसार परीक्षा घेतल्या जातात. भारतात तुम्हाला वैद्यकीय सेवा करायची असेल, तर इथे परत आल्यानंतर एक परीक्षा द्यावी लागते. किव्‍ह मेडिकल युनिव्हर्सिटी, नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी, खारकीव मेडिकल युनिव्हर्सिटी, विनित्सा मेडिकल युनिव्हर्सिटी, ब्लॅक सी नॅशनल युनिव्हर्सिटी, बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी अशी काही महत्त्‍वाची वैद्यकीय विद्यापीठे आहेत. तेथे भारतीय विद्यार्थी आहेत.

ब्रह्मनाळचा ऋषभनाथ मोळाज परतला

युक्रेनमध्ये जिल्ह्यातील दहांहून अधिक लोक अकडल्याची माहिती समोर आली. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ब्रह्मनाळ येथील ऋषभनाथ मोळाज हा वैद्यकीय विद्यार्थी अडकला होता. त्याची नोंद सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून असली, तरी तो मुळचा सांगलीचा. आज तो विमानाने सुरक्षितपणे दिल्लीत परतला, त्याच्या कुटुंबीयांनी निश्‍वास टाकला. मूळ ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथील वृषभनाथ मोळाज वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेला होता. त्याचे वडील राजेंद्र रत्नागिरी जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात कर्मचारी असून, आई अर्चना या मूळच्या एरंडोली (ता. मिरज) येथील आहेत.

ऋषभनाथ युक्रेनमध्ये अडकल्याने सारे तणावात होते. चिंता वाटत होती, परंतु तो तिकडून सारे ठीक आहे, काळजी करू नका, प्रत्यक्ष युद्धापासून म्हणजे किव्‍ह शहरापासून आम्ही सुमारे अकरा तासाच्या अंतरावर आहोत, असे सांगत होता. त्यांचे विमान दिल्लीला पोहचले आणि आम्ही निःश्‍वास सोडला. आमची मुले ज्या देशात शिकत होती, तिथल्या लोकांचे आयुष्य सुरक्षित राहो, अशी आम्ही प्रार्थना करतोय, असे अर्चना मोळाज सांगत होत्या. ऋषभनाथ हूदरहूड इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये होता. आज सकाळी हंगेरीमार्गे त्यांना दिल्लीला आणण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदीया यांनी विमानात त्यांचे स्वागत केले आणि त्यांना धीर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT