कोल्हापूर

'ऋतुजा'चा संघर्ष सुरुच, मुलांना जन्म दिल्यानंतर गेली होती कोमात

प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा

प्राथमिक स्थितीत आवश्‍यक उपचार मिळाले नसल्याने ऋतुजावर ही वेळ आली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

कंदलगाव (कोल्हापूर): कोल्हापूरातीत खासगी दवाखान्यात ११ महिन्यापूर्वी दोन चिमुकल्या बाळांना जन्म देऊन 'ऋतुजा' कोमामध्ये गेली. प्राथमिक स्थितीत आवश्‍यक उपचार मिळाले नसल्याने ऋतुजावर ही वेळ आली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

पाचगाव येथील हनुमान नगरात माहेर असलेल्या ऋतुजाचा ३० डिसेंबर २०१८ ला गारगोटीतील रोहित पाटीलशी विवाह झाला. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या संसारात दोन चिमुकली जन्म घेणार या आनंदात असणाऱ्या ऋतुजाला कोल्हापुरातीस एका दवाखान्यात बाळंतपणासाठी उपचार सुरू केले. मात्र प्राथमिक स्थितीतले उपचार योग्य रितीने झाले नसल्याने ऋतुजा कोमात आहे. पती रोहित व नातेवाईक तिला कोमातून बाहेर काढण्यासाठी वणवण भटकत आहेत. या खर्चाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. रोहितचा गोकुळ शिरगाव येथील लघू फौंड्रीचा उद्योग कोरोनाकाळात थंडावला असल्याने त्यांनी पत्नी ऋतुजावर सध्या घरीच उपचार करण्याचे ठरविले आहे.

चिमुकल्यांना मिळेल का मायेची ऊब...

ऋतुजाने श्रीशा व श्रीराज या दोन बाळांना जन्म दिला. ११ महिन्यापासून आई जवळ घेईल, या आशेने हात-पाय हालवित मातेच्या ऊबीला झोपलेली असतात. परंतु, तरी त्यांची माय कोमातून बाहेर आली नाही.

कोल्हापूरकरांचे दातृत्व आभाळाऐवढे...

ऋतूजा कोमात असलेली बातमी कोल्हापूरकरांच्या कानावर पडली आणि सुरू झाले दातृत्व. पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी, जिजा वेल फेअरच्या नेहा देसाई, डॉ. स्नेहलदत्त खाडे यांच्यासह अनेकांनी दातृत्वचा हात पुढे केल्याने काही प्रमाणात सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, अजूनही उपचारासाठी मोठा खर्च असल्याने कोल्हापूरकर आपला वसा सोडणार नाहीत अशी आशा रोहितने बोलून दाखविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT