कोल्हापूर

'तुम्ही आई वडिलांचा आधार; टोकाचे पाऊल उचलू नका'; ऋतुराज पाटलांचे आवाहन

आपल्या अडचणी, प्रश्न आपल्या मित्र परिवाराशी, कुटुंबियांशी मनमोकळे मनाने बोला.

स्नेहल कदम

कोल्हापूर : स्वप्नील सुनील लोणकर (swapnil lonkar) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे शिक्षणसह विविध क्षेत्रातून प्रतिक्रीया येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी (Job) नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे स्वप्नीलने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर टिकेची झोड उठवली आहे. मात्र यादरम्यान अनेकांनी विद्यार्थ्यांना असा निर्णय न घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान आमदार ऋतुराज पाटील (ruturaj patil) यांनी ट्वीट करुन विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

ते म्हणतात, राज्यातील होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींना माझी नम्र विनंती आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबियांना कायमस्वरूपी दुःखी करणारे कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका. तुम्ही तुमचे आई वडील आणि कुटुंबीयांचा भविष्यकाळातील आधार आहात. आपल्या अडचणी, प्रश्न आपल्या मित्र परिवाराशी, कुटुंबियांशी मनमोकळे मनाने बोला. संवादाने प्रश्न सुटतात आणि प्रत्येक अडचणीला पर्याय हा असतोच ही भावना मनात ठेवा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएसीच्या सर्व जागा भरल्या जातील अशी घोषणाही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT