Accident on Malikwad-Nandi Road esakal
कोल्हापूर

Road Accident : देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला! कार-दुचाकीच्या धडकेत भाऊ-बहीण जागीच ठार, सदलग्यात हळहळ

बहीण-भावाच्या अपघाती मृत्यूने सदलगामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सदलगाहून जाताना मलिकवाड - नणदी रस्त्यावरील शर्यतीच्या माळाजवळ आलेल्या मोटारीने त्यांना धडक दिली.

सदलगा, मलिकवाड : देवदर्शनासाठी चिक्कोडीकडे जाताना मलिकवाड-नणदी रस्त्यावरील शर्यतीच्या माळाजवळ मोटारीने दुचाकीला समोरासमोर धडक (Road Accident) दिल्याने भाऊ-बहीण जागीच ठार झाले.

प्रशांत नागराज तुळशीकट्टी (वय २०) आणि प्रियांका नागराज तुळशीकट्टी (वय १९) अशी ठार झालेल्या भाऊ-बहिणीची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सदलगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील प्रशांत आणि त्याची बहीण प्रियांका हे दोघे मोटारसायकलवरून चिक्कोडी येथील परटी नागलिंगेश्वर यात्रेनिमित्त दर्शनासाठी जात होते.

सदलगाहून जाताना मलिकवाड - नणदी रस्त्यावरील शर्यतीच्या माळाजवळ आलेल्या मोटारीने त्यांना धडक दिली. मोटारीने दुचाकीला फरफटत नेल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. मलिकवाड येथील दादासाहेब कोळी हे मुलग्यासह गोव्याहून नवी मोटार घेऊन येत होते. यावेळी गाव जवळ असतानाच त्यांच्या मोटारीला अपघात झाला.

समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील बहीण व भाऊ उडून बाजूला फेकले गेले. मोटारीतील एअरबॅग उघडल्याने त्यातील दोघांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. प्रशांत आणि प्रियांका हे सदलगा येथील हेस्कॉम कंत्राटदार नागराज तुळशीकट्टी यांची मुले आहेत. बहीण-भावाच्या अपघाती मृत्यूने सदलगामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT