Sagar Kamble Honored In The Hands Of President Kolhapur Marathi News
Sagar Kamble Honored In The Hands Of President Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

"चंदगड'च्या सागरचा राष्ट्रपतींकडून सन्मान

सुनील कोंडुसकर

चंदगड : सागर वसंत कांबळे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा तो एक सदस्य. कोकण सीमेवरील इनाम म्हाळुंगे या छोट्या खेड्यात दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. चित्रकला ही त्याची "पॅशन'. त्यामुळे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होऊनही तो कोल्हापूरच्या कलानिकेतनची पायरी चढला. पुढे मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ ऑर्टमधून प्रथम श्रेणीतून क्रिएटीव्ह पेंटींगची पदवी संपादन केली. गेल्या 8 वर्षात 25 पुरस्कार त्याच्या खात्यावर जमा झाले. वयाच्या 21 व्या वर्षी दिल्लीच्या ललित कला अकादमीच्या पुरस्काराने त्यावर मुकुट चढवला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले. 

ललित कला अकादमीचे 61 वे राष्ट्रीय संमेलन बुधवारी (ता. 4) दिल्लीत झाले. त्यात सागरच्या चित्राची दृष्य कला विभागात निवड झाली. या विभागासाठी देशभरातून सहा हजार चित्रकारांनी आपली चित्रे पाठवली होती. त्यातून सागरच्या चित्राला क्रमांक मिळाला. यापूर्वी त्याला राज्य पातळीवरील विविध पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार त्याच्यासाठी शाब्बासकीची थाप ठरले.

2016 मध्ये दक्षिण कोरीयामध्ये झालेल्या चित्रकला स्पर्धेत सागरला भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. घरची पार्श्‍वभूमी नसताना केवळ या विषयातील आवड आणि त्यासाठी झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळे त्याचा हा प्रवास यशस्वी ठरला. ग्रामीण भागात करीअर म्हणून काही ठराविक अभ्यासक्रम मनावर ठसलेले आहेत. चित्रकलेसारख्या विषयात करीअर करायचे म्हटले तर वेड्यात काढले जाते. परंतु सागरचा स्वतःच्या कलेवर विश्‍वास होता. त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी होती. त्यामुळेच त्याने उत्तरोत्तर प्रगतीची शिखरे पार केली. 

ललित कला अकादमीसाठी त्याने "ग्रामीण भागातील महिलांवरील बंधने' या विषयाची निवड केली. एका मोठ्या पिंजऱ्यात बसलेली महिला, पिंजरा म्हणजे तिच्यावरील सामाजिक बंधनाचे प्रतिक. तिच्याकडे अवकाश व्यापण्यासाठी गरूडाचे पंख आहेत परंतु रुढी, परंपरांनी हे पंख जखडलेले आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिक म्हणून खाली साप दाखवला आहे. त्याच्यासह समाजातील असंख्य डोळे तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. ती जरा जरी वेगळी वागली तर ते तिला डसणार आहेत अशा आशयाचे हे चित्र वैशिष्ट्यपूर्ण आणि समाज प्रबोधन करणारे ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT