sagar shelke
sagar shelke esakal
कोल्हापूर

कागलचा शिवप्रेमी सागर 50 किमी अंतर धावत आणतो 'शिवज्योत'

नरेंद्र बोते

कागल (कोल्हापूर): शिवजयंती (Shiv jayanti) साजरी करायची म्हटले की शिवज्योत कोठून आणायची हा पहिला विचार होतो. जिल्ह्यात जवळच्या गडकिल्ल्यावरून शिवज्योत आणण्यात येते. यात पन्हाळगडाला (Panhala) प्रथम प्राधान्य देण्यात येते. कागल (Kagal) शहरातील एक मंडळ गेली अनेक वर्षे पन्हाळगडावरून कागलपर्यंत शिवज्योत आणत आहे. हे अंतर ५० किलोमीटर भरते. पण या मंडळातील एक तरुण गेली दोन वर्षे एकटा ज्योत घेऊन ५० किलोमीटर धावत येतो आणि तेही अनवानी. म्हणतात ना मनात जिद्द असेल तर काही अशक्य नाही. अशा या जिद्दी तरुणाचे नाव आहे सागर काशिनाथ शेळके (sagar shelke). येथील धनगर गल्लीत तो राहतो.

छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की अंगात अमाप उत्साह संचारतो,रक्त सळसळते. तरुणाईच्या दृष्टीने शिवजयंती म्हणजे उत्साह, जल्लोष आणि काहीतरी वेगळे करून दाखविण्याची उमेद असते. कागल शहरात अनेक तरुण मंडळे शिवजयंती साजरे करतात. धनगर गल्लीतील चॅम्पीयन ग्रुपच्यावतीने साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीसाठी प्रतिवर्षी पन्हाळगडावरून शिवज्योत आणण्यात येते.

पन्हाळगड ते कागल हे तब्बल ५० किलोमीटर अंतर गेली दोन वर्षे सागर एकटाच ज्योत घेऊन अनवानी धावतो आहे.

यंदा शिवज्योत आणण्यासाठी मंडळाचे दहाबारा कार्यकर्ते शिवजयंतीच्या पहाटे तीन वाजता पन्हाळगडावर पोहोचले. त्यात सागर शेळके याच्या बरोबर रुपेश बोते, स्वप्नील बोते, ओंकार मिसाळ, अजिंक्य शेळके, रोहित हजारे, युवराज राणगे, कुलदिप मिसाळ, चेतन करिकट्टे, रणजित संकपाळ, मोहन राणगे आदिंचा समावेश होता. गडावरील शिवाजी महाराज मंदीरात पहाटे साडेतीन वाजता ज्योत पेटवून घेण्यात आली. ती ज्योत सागर शेळकेने घेतली. तेथून सागर ज्योत घेऊन धावू लागला तर मित्रमंडळी शिवरायांचा जयघोष करीत गाडीवरून निघाले.

सागर न दमता धावत धावत निघाला. सर्वजण कोल्हापुरात पहाटे पाचच्या सुमारास महापालिकेसमोरील शिवरायांच्या पुतळ्याजवळ आले. त्याठिकाणी ज्योत घेऊन सागरने प्रदक्षिणा काढल्या. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील (Shivaji University) अश्वारूढ पुतळ्याला प्रदक्षिणा घालून अभिवादन केले आणि सर्वजण कागलकडे निघाले. सात वाजता सर्वजण कागलमध्ये पोहोचले. तब्बल साडेतीन तास सागर ज्योत घेऊन अनवानी धावला. पन्हाळगड ते कागल हे तब्बल ५० किलोमीटर अंतर गेली दोन वर्षे सागर एकटाच ज्योत घेऊन अनवानी धावतो आहे. सागरला पोलीस व्हायचे आहे. त्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. तो आकरावीत शिकतो. त्याचे वय १८ वर्षे असून त्याची उंची १६४ सेमी आहे. पोलीस भरतीवेळी त्याची उंची या प्रयत्नाच्या आड येण्याची भीती आहे. त्याला मार्गदर्शनाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT