कोल्हापूर

जनमानसांत 'दै. सकाळ'चे स्थान बळकट : श्रीमंत शाहू छत्रपती

'सकाळ'ने राबवलेले समाजोपयोगी उपक्रम व जागृतीतून काही प्रश्न सुटू शकले.

शिवाजी यादव

कोल्हापूर : दै. सकाळ माध्यमसमुहाने विश्वासार्ह बातम्या देण्यासोबत समाजसेवा आणि जनजागृतीचे व्रत जोपासले, त्याला लोकांचे पाठबळ मिळाले. त्यामुळे 'सकाळ'ने राबवलेले समाजोपयोगी उपक्रम व जागृतीतून काही प्रश्न सुटू शकले. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी 'सकाळ'ने घेतलेल्या भूमिकांना लोकबळ लाभत आहे. यातून जनमानसांत 'सकाळ'चे स्थान बळकट आहे.’’ असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छ्त्रपती यांनी आज येथे केले. दै. 'सकाळ'चा ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजवणाऱ्या तसेच नव्या युगात काळाशी ससुंसगत भरारी घेत कतृत्व सिध्द करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले की, 'धनगरवाड्यापासून ते मुंबईच्या मॅट्रो पॉलिटीन सिटीपर्यंत रोज घडणाऱ्या घडोमोडी 'सकाळ'ने वाचकांपर्यंत पोहचवल्या. चांगल्याचे कौतुक जरूर केले, वाईटावर प्रहारही केला. यासाऱ्यातून विश्वासार्हता राखली. त्यामुळे वाचकाचे पाठबळ सतत दै. 'सकाळ'ला मिळत गेले. समाजातील जो घटक आवाज काढू शकत नाही. त्याचा आवाज होऊन भूमिका मांडण्याचे सुत्र 'सकाळ'ने राबवले. त्यालाही वाचकांचा प्रतिसाद लाभला. अनेक पर्यावरण, जलसंवर्धन, प्रदुषण मुक्त रक्षा विर्सजन, डॉल्बी मुक्ती, नदी तलाव जंगल स्वच्छता असे अनेक समाजोपयोगी उपक्रम सकाळने राबवले त्यातून मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाले, ते लोकांनी स्वीकारले संवर्धीत केले, लोकसमुहच सकाळच्या उपक्रमांना बळ देत आहे.'

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले की, 'वृत्तपत्र माध्यमात स्पर्धा वाढली आहे. अनेक आव्हाने आहेत, त्यांना तोंड देत 'सकाळ'ने विश्वासार्ह पत्रकारिता टिकवली आहे. अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. समाजातील चांगल्याचे कौतुकही 'सकाळ'ने केले. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून 'सकाळ' भूमिका मांडत आहे. जलसंर्वधन सारख्या अनेक सामाजिक प्रश्नांवर व्यापक उपक्रम राबवून सामाजिक भानही जपले आहे. ही बाब उभारी देणारी आहे.' यावेळी व्यासपीठावर सकाळचे उप सरव्यवस्थापक रविंद्र रायकर उपस्थित होते. यावेळी निवासी संपादक निखिल पंडीतराव यांनी आभार मानले.

उद्योजक बाळासाहेब कवडे - मुलाचे अकाली निधन झाले. उद्योग एकाकी पडला. लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्या उद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी श्री. कवडे यांनी मुलांचा उद्योग वयाच्या ९१ व्या वर्षी आपल्या खांद्यावर घेतला. त्यांच्या विलक्षण जिद्दीबद्दल त्यांना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

रेसर - सुहानी पाटील - मोटर सायकल शर्यतीत केवळ जिल्हा नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेतही भरधाव वेग घेत बक्षीसे जिंकून रेसर म्हणून करिअरमध्ये उत्तुंग झेप घेतली. याबद्दल सुहासीनीला श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे व सहकारी - कोरोना काळात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोरोना संसर्गाच्या भीतीने जवळच्या नात्यांनाही दूर व्हावे लागले, अशा स्थितीत प्रत्येक मृतांवर अंत्यसंस्कारासाठी महापालिका पंचगंगा स्मशानभूमीतील आरोग्य निरिक्षक श्री. कांबळे व त्यांच्या सहकारी कर्मर्चाऱ्यांनी कर्तव्य बजावले. त्यांना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

स्टार्टप संचालक सचिन कुंभोजे - नव्या काळात बेरोजगारी आहे. अशा बेरोजगारांना उद्योग व्यवसायाच्या नव्या वाटा दाखवण्यासाठी उपयुक्त ठरणारा स्टार्टप उद्योग सुरू केला. सचिन यांनी स्वतःची प्राध्यापकांची नोकरी सोडून ओपॅक्स हा स्टार्टप सुरू केला. त्याव्दारे नव्या पिढीतील युवक युवतींनाही ते मार्गदर्शन करत स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी जिद्दीचे बळ देतात. याबद्दल त्यांना आमदार जाधव यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

अभिनेता धनंजय पोवार - कोरोना लॉकडाऊन होता घराघरांत लोक बंदिस्त झाले होते. कंटाळलेल्या लोकांना रंजन करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करत धनंजय यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. चिंतीत मनावरही प्रसन्नता व उत्साहाचा शिडकाव केला. अभियन विलक्षण संवाद शैलीव्दारे त्यांनी सादर केलेल्या कलाकृती सोशल मिडीयावर गाजत वाजत राहील्या याबद्दल त्यांना आमदार जाधव यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT