sugar factory sakal
कोल्हापूर

Kolhapur News : पहिल्याच दिवशी महाडिकांसह १७ जणांचे अर्ज

२१६ उमेदवारी अर्जांची विक्री; इच्छुकांची कार्यालयाबाहेर गर्दी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह १७ जणांचे अर्ज दाखल झाले. आज २१६ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. या निवडणुकीसाठी महादेवराव महाडिक यांनी संस्था गटातून तर अमल यांनी गट क्रमांक दोनमधून अर्ज दाखल केला.

`राजाराम’ साठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या कार्यालयात ही प्रक्रिया सुरू झाली. अर्ज भरण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत होती, पण सकाळी सात वाजल्यापासूच अर्ज घेण्यासाठी इच्छुकांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. कार्यालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अर्ज घेऊन लगेच १७ उमेदवारांनी ते दाखलही केले

आज अर्ज दाखल केलेल्या अन्य प्रमुखांत कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप उलपे, सर्जेराव माने, संचालक वसंत बेनाडे, तानाजी पाटील, शिवाजी किबिले, विलास यशवंत जाधव, बाबूराव बेनाडे, किरण भोसले, शिवाजी पाटील, सर्जेराव भंडारे यांच्यासह किरण यशवंत जाधव, डॉ. मारूती किडगांवकर, दगडू मारूती चौगुले, संतोष बाबूराव पाटील, देवाप्पा मुधाळे यांचा समावेश आहे. २७ मार्च हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून उमेदवारी अर्जांची छाननी २९ मार्च रोजी होणार आहे. १२ एप्रिल हा या निवडणुकीतील अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT