Samarjeet Ghatge joins NCP Sharad Pawar Group 
कोल्हापूर

Samarjeet Ghatge : पक्ष प्रवेश गैबी चौकातच का? महाराष्ट्राच्या 'ओरिजनल वस्ताद'चा उल्लेख करत समरजित घाटगेंनी सांगितलं कारण

samarjeet ghatge joins NCP Sharad Pawar : कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे

रोहित कणसे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कागल येथे भाजपला मोठा धक्का बसला आहे. आज कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर कागल विधानसभा मतदारसंघातील समिकरणे बदलणार असून हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

पक्ष प्रवेशानंतर समरजित घाटगे यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान ते म्हणाले की, मला लोकांनी विचारलं की गैबी चौकच का निवडला? तर मी लोकांना सांगितलं की मी नाही निवडला, तर शरद पवार यांनी ठरवलं की गैबी चौकातच सभा झाली पाहीजे... पुढे घाटगे यांनी पक्षप्रवेश आणि सभा घेण्यासाठी गैबी चौकच निवडण्यामागचं कारण देखील सांगितलं की, ते म्हणाले की सध्याच्या काळात असं वाटतंय की, गैबी चौक ही सभा घेण्याची जागा कोणाचीतरी आहे, ही जागा महाराष्ट्राच्या ओरिजनल वस्तादाची जागा आहे, ही आठवण करून देण्याची आता गरज वाटत आहे.

निर्णय का घेतला?

आपण जो निर्णय घेतला तो कागल, गडहिंग्लज, उत्तूरच्या भविष्यासाठी घेतला. येत्या काळच्या परिवर्तनासाठी हा निर्णय घेतला. कोणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघाला विजय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतला, असेही समरजित घाटगे यावेळी म्हणाले. आठ वर्ष प्रामाणिकपणे आपण एका पक्षात काम केलं. यापुढे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते जे आदेश देतील त्या प्रमाणे आपण काम करणार असेही घाटगे यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधअये फूट पडल्यानंतर अजित पवार भाजपसोबत गेले. त्यामुळे घाटगे यांच्या कागल येथून उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले हेते. त्यांनी २३ ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.

गैबी चौकाला इतकं महत्व का?

कागल मतदारसंघातील विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. गेल्या सहा निवडणुका मुश्रीफांनी या मतदारसंघातून लढवल्या. त्यापैकी पाच निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. मुश्रीफ यांच्या प्रचारातील शेवटची सभा ही याच ऐतिहासिक गैबी चौकात होत असे. ज्यामध्ये शरद पवार यांची उपस्थिती ही ठरलेली असे.पण आता राजकारण बदललं असून कागल येथील त्यात ऐतिहासिक गैबी मैदानात मुश्रीफांच्या विरोधात शरद पवारांची सभा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT