कोल्हापूर

समरजितसिंह घाटगे म्हणाले.. आता राजकीय ताळेबंदही कळू लागलाय

सकाळ वृत्तसेवा

माझ्यामुळे संस्था नाही तर संस्थेमुळे मी आहे - घाटगे

कागल : सीए असल्यामुळे कारखान्याचा ताळेबंद तर कळतोच; परंतु आता निवडणुकीमुळे राजकीय ताळेबंद कसा जमवायचा हेही कळाले आहे, असे प्रतिपादन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची २०२१ ते २०२६ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. बहुराज्यसह संस्थांचा कायदा तरतुदीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यस्थळावर झालेल्या सभेत त्यांनी घोषणा केली.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘‘विक्रमसिंह घाटगे यांच्यानंतर मलाही सभासदांनी चांगली साथ दिल्यामुळेच कारखान्याचा नावलौकिक कायम राखण्यात यशस्वी झालो आहे. प्रतिकूल स्थितीत सीमाभागातील सभासदांनी दिलेली साथ मोलाची आहे. सभासद व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे शाहू साखर कारखाना देशात नंबर वन ठरला आहे. सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे. साहेबांची शिकवण सतत स्मरणात आहे. माझ्यामुळे संस्था नाही तर संस्थेमुळे मी आहे. त्यामुळे ‘शाहू’चा कारभार राजकारण विरहित व सभासद हिताचा करण्याचा यापुढेही प्रयत्न राहील.’’

काकडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला. समरजितसिंह घाटगे, श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, अमरसिंह घोरपडे, माजी आमदार वीरकुमार पाटील यांच्यासह नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार झाला. ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. आभार अमरसिंह घोरपडे, युवराज पाटील यांनी मानले.

बिनविरोध संचालक मंडळ गटनिहाय ः अ वर्ग उत्पादक सभासद गट ः समरजितसिंह घाटगे, श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,

अमरसिंह घोरपडे, वीरकुमार पाटील, धनंजय पाटील, सचिन मगदूम, संजय नरके, यशवंत माने, शिवाजीराव पाटील, सतिश पाटील, प्रा. सुनील मगदूम. उत्पादक सभासद गट (महिला) ः रेखाताई पाटील, सुजाता तोरस्कर. अनुसूचित जाती/जमाती गट- भाऊसो कांबळे. ब वर्ग बिगर उत्पादक सभासद सहकारी संस्था गट ः युवराज पाटील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून मैदानात, दिग्गजांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज

Marathi News Live Update: होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेला जाग; जवळच्या इतर अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई

T20 World Cup 2024 : कर्णधार रोहित अन् आगरकरला हार्दिक पांड्या संघात नको होता; मग तरी कशी झाली निवड?

VIDEO: 'गजगामिनी चाल' म्हणजे काय? अदिती राव हैदरीच्या 'त्या' वॉकनं नेटकऱ्यांना लावलं वेड, व्हिडीओ होतोय व्हायरल

Loksabha Election Voting : आयर्लंड, अमेरिकेहून येत दांपत्य, युवतींचे मतदान; मराठवाड्यातील परदेशस्थ भारतीयांनीही बजावले राष्ट्रीय कर्तव्य

SCROLL FOR NEXT