कोल्हापूर

'या' कारणासाठी समरजितसिंहांनी मानले गडकरींचे 'आभार'

सकाळ डिजिटल टीम

घाटगे यांच्या मागणीचा विचार करून होऊ घातलेल्या कागल - सातारा सहापदरीकर कामाच्या वेळी हा उड्डाणपूल बांधण्यासाठी आणि लहान पूल मोठा करण्यास मंजुरी दिली आहे.

कागल : कागल - सातारा राष्ट्रीय महामार्गाचे (national highway) सहा पदरीकरणचे काम पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात कागलच्या 'श्री लक्ष्मी टेकडी' जवळील उड्डाणपूल उभा करण्याबाबत आणि कागल शहराजवळ बसस्थानकाच्या पश्चिमेला असलेला लहान पूल मोठा करण्याबाबतचे निवेदन मार्च महिन्यात भाजपाचे समरजितसिंह घाटगे (samarjitsing ghatage) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांची भेट घेऊन दिले होते.

याशिवाय बेळगाव - सावंतवाडी (belgaum-sawantwadi) या प्रस्तावित रेल्वे मार्गास मान्यता मिळावी व बेळगाव वेंगुर्ले या महामार्गाचे चार पदरी विस्तारीकरण करावे आशा विविध विषयांवर सुमारे अर्धा तास चर्चा केली होती. घाटगे यांच्या मागणीचा विचार करून होऊ घातलेल्या कागल - सातारा सहापदरीकर कामाच्या वेळी हा उड्डाणपूल बांधण्यासाठी आणि लहान पूल मोठा करण्यास मंजुरी दिली आहे. यासंबंधित खर्चात तरतुद केली असल्याचे घाटगेंना गडकरी यांनी पत्राद्वारे कळवले होते. याप्रकरणी आज दिल्ली येथे नितीन गडकरी यांची भेट घेऊन आभार मानले.

"पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल जवळील लक्ष्मी टेकडी येथे उड्डाणपूल उभा करावा याबाबत मागील दोन वर्ष प्रयत्न करत आहे. या टेकडीच्या पूर्व बाजूला पंचतारांकित तर उत्तरेला गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत आहे. विविध साखर कारखाने व अनेक छोटे-मोठे प्रकल्प येथे कार्यरत आहेत. वर्दळीचा वाहतुकीवर परिणाम होत असतो. त्यामुळे याठिकाणी अनेक वेळा लहान मोठे अपघात होतात. उड्डाणपूल झाल्यास या अपघातांचे प्रमाण घटेल. शिवाय वाहतुकही सुरळीतपणे चालू राहील त्यामुळे या अत्यावश्यक असलेला उड्डाण पूल व्हावा व पश्चिमेस असलेला अरुंद पूल मोठा करावा यासाठी आग्रही होतो. कागल -सातारा सहा पदरीकरण कामात त्याची तरतूद केली असल्याचे मागील महिन्यात नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे कळवले आहे."

- समरजितसिंह घाटगे, भाजपा जिल्हाध्यक्ष, ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT