interview for shrimant shahu chhatrapati maharaj 
कोल्हापूर

संभाजीराजेंचा निर्णय वैयक्तिक त्यामुळं छत्रपती घराण्याचा अपमान नाही - शाहूराजे

राज्यसभेसाठी अपक्ष लढण्याचा संभाजीराजे छत्रपती यांचा निर्णय वैयक्तिक होता.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : राज्यसभेसाठी अपक्ष लढण्याचा संभाजीराजे छत्रपती यांचा निर्णय वैयक्तिक होता. याबाबत त्यांनी कुटुंबियांशी सल्लामसलत केली नव्हती, त्यामुळं शिवसेनेनं त्यांना उमेदवारी नाकारण हा छत्रपती घराण्याचा अपमान असं म्हणता येणार नाही, असं विधान संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती यांनी केलं आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी औपचारिक गप्पांमध्ये त्यांनी काही महत्वाचे दावेही केले. (Sambhaji Raje decision is personal so it is not an insult to Chhatrapati family says Shahu Chhatrapati)

शाहू छत्रपती म्हणाले, संभाजीराजे यांनी आत्तापर्यंत जे राजकीय निर्णय घेतले ते वैयक्तिक पातळीवर घेतले आहेत. यासाठी त्यांनी कधीही आमच्याशी आणि कुटुंबियांशी चर्चा केली नाही. त्यामुळं त्याचे निर्णय हे छत्रपती घराण्याचे निर्णय होते असं म्हणता येणार नाही. त्यामुळं शिवसेनेनं त्यांना उमेदवारी नाकारली हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असं म्हणता येणार नाही, अस स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.

सन २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून पराभूत झाल्यानंतर त्यांची वाटचाल वैयक्तीक राहिली आहे. त्यानंतर सन २०१६ मध्ये संभाजीराजे यांनी राष्ट्रपतीनियुक्त खासदार होऊ नये असं आम्हाला वाटत होतं. त्यांनी छत्रपती घराण्याशी चर्चा करुन कुठलाही निर्णय घेतलेला नाही, त्यांना आम्ही कधीही विरोध केला नाही. राजकीय संघटना काढून त्यांना पुढे जायचं असेल तर आमच्या शुभेच्छा आहेत, असंही शाहू छत्रपती यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी घोषीत केली होती. पण शिवसेनेनं आपण या जागेवर उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यासाठी संभाजीराजेंना शिवसेनेत येण्याची ऑफरही दिली होती. पण संभाजीराजेंनी ही ऑफर धुडकावत आपल्यालाच शिवसेनेनं पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली. पण शिवसेनेनं आपलाच उमेदवार असेल असं सांगत अखेर कोल्हापुरातील शिवसेना नेते संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर संभाजीराजे यांनी या निवडणुकीतून माघार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर हा छत्रपती घराण्याचा अपमान असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT