Yuvraj Sambhajiraje Chhatrapati  esakal
कोल्हापूर

Kolhapur Bandh : सरकारने दोषींवर इतकी कठोर कारवाई करावी, की…; कोल्हापूर प्रकरणी संभाजीराजे कडाडले!

रोहित कणसे

सोशल मीडियावर अक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून कोल्हापूर शहरात तणावाचं वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरातील परिस्थितीवरून संताप व्यक्त केला आहे. तसेच सरकारने दोषींवर चार्जशीट दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

संभाजीराजेंनी ट्वीट करत सरकारकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. "शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे.सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे"असे संभाजीराजे म्हणाले आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शहरातील बिंदू चौक, अंबाबाई मंदिर परिसर, महाद्वार रोड या परिसरात तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. यावेळी जमावाकडून अनेक दुकानांची, मालगाड्यांची तोडफोड करण्यात आलीये. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला तरी परिस्थिती नियंत्रणात येत नाहीये. यामुळं काही ठिकाणी पोलिसांनी अश्रूधुर कांड्या फोडल्या.

औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही, असे सांगत, जनतेला शांतता पाळण्याचं आवाहन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच, कोल्हापूर पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करा अशी सूचनादेखील दिली आहे. कुणी चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणा, असेही निर्देश गृहविभागाने दिले आहेत. यासोबत खबरदारी म्हणून इतर जिल्ह्यांवरही बारीक नजर ठेवा अशी सूचनाही पोलिसांना देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Reservation: राज्य सरकारला मोठा झटका! ६७% ओबीसी आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यापासून केवळ २७ प्रमाणपत्रांचं वाटप; सरसकट आरक्षण नाहीच, दिशाभूल कोण करतंय?

Video: बाबो...! सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? पती झहीर इक्बालने पापाराझींसमोर तिच्या पोटावर हात ठेवला आणि...

Nashik Post : आनंदाची बातमी! टपाल विभागाकडून आता कॅनडा, अमेरिकेतही पोचणार दिवाळी फराळ!

Latest Marathi News Live Update : राजनाथ सिंह यांची पुण्यात डीआरडीओच्या तोफखाना प्रदर्शनाला हजेरी

SCROLL FOR NEXT