कोल्हापूर

सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय : संभाजीराजे छत्रपती

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) राज्याचा दौरा केल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी (sambhajiraje chhtrapati) पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर केली होती. आता संभाजीराजेंनी ट्विटरवरून खळबळजनक असं विधान केलं आहे. त्यांनी सरकार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. संभाजीराजेंनी ट्विटरवर म्हटले की, माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहिती नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे? असा सवालही संभाजीराजेंनी विचारला आहे. ट्विटरवरून संभाजीराजेंनी हेरगिरीबाबत केलेलं वक्तव्य नेमकं कोणत्या सरकारबद्दल आहे याबाबत मात्र संभ्रम आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील समाजबांधव, मराठा क्रांती (maratha kranti morcha) मोर्चातील समन्वयक, कार्यकर्ते, कायदेतज्ज्ञांच्या भेटी घेतल्या. त्यांनी राज्यभर दौरा करून आरक्षणासंदर्भात काय मते आहेत याची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत आरक्षणासाठी 6 जूनपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. यावेळी त्यांनी मराठा समाज अस्वस्थ असल्याचंही म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT