कोल्हापूर

'संभाजीराजे छत्रपतींना दिलेले आश्वासन राज्यसरकारने पाळावे'

९ ऑगस्टपासून मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनासाठी सकल मराठा समाज सज्ज

संदीप खांडेकर

कोल्हापूर : खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje) यांना दिलेले आश्वासन राज्य सरकारने पाळावे. अन्यथा संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्टपासून मराठा (maratha reservation) आरक्षण मागणीच्या आंदोलनासाठी सकल मराठा समाज सज्ज आहे, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे सकल मराठा समाजातर्फे पाठविण्यात आले. (uddhav thackeray)

पत्रात म्हटले आहे की, मराठा समाजाला द्यायच्या आरक्षणाबरोबर इतर काही महत्वाच्या मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या होत्या. या संदर्भात संभाजीराजे यांनी मराठा समाज समन्वयकांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळावर मूक आंदोलन केले होते. त्यावेळी राज्य शासनाच्या वतीने संभाजीराजे यांना बैठकीस बोलवून सर्व मागण्या मार्गस्थ करण्याचे ठोस आश्वासन दिले होते.

मराठा समाजातील २१८५ एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ३१ जुलै २०२१ पूर्वी नियुक्ती करण्याचे जाहीर आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. ३१ जुलै उलटूनही नियुक्त्या दिलेल्या नाहीत. म्हणजेच राज्य सरकार सकल मराठा समाज व संभाजीराजे यांची फसवणूक करून विश्वासघात करत आहे, असे आमचे म्हणणे आहे. शासनास विनंती आहे की, दिलेले आश्वासन पाळून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये. बाळ घाटगे, राजू सावंत, बाळासाहेब पाटील, हणमंत पाटील, अजित सासने, प्रमोद पुंगावकर, अनिल घाटगे, चंद्रकांत पाटील, सुनिता पाटील, प्रसाद जाधव, बाबा महाडिक, अॅड. रणजित गावडे, दादासाहेब लाड, रमेश पोवार, महेश जाधव यांची पत्रावर नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

Latest Marathi News Update: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे एसीबीच्या जाळ्यात

iPhone Duo Screen Issue: Apple iPhone Duoच्या स्क्रीनला तडे! कंपनीकडून रिप्लेसमेंट मिळणार का? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT