Same marks for twin brothers in 10th exam kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरातील जुळ्या भावांचा दहावीचा निकाल आश्चर्यकारक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर -  नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्यातील निकाल चांगला लागला असून विध्यार्थ्यांसह पालकही खूश आहेत. आपाल्या पाल्याने मिळविलेल्या यशाचा आनंद अनेक घरात साजरा होत आहे. यासोबतच आता पुढे काय करायचे यावरही विचारविणीमय सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचाही निकाल चांगला लागला आहे. शिवाय येथील जुळ्या भावांचा निकालही आश्चर्यकारक लागला आहे. 


 शाळा एक, वर्गही एक आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गुणही सेमच अशी अनोखी यशकथा आहे, फुलेवाडीतील प्रज्वल आणि प्रणिल देसाई यांची. ते दोघे जुळी भावंडे. फुलेवाडीतील श्री गुरुदेव विद्यानिकेतनमध्ये ते एकत्र शिकत होते. दहावीच्या परीक्षेत त्यांना समान गुण मिळाल्याने सर्वांनाच आश्‍चर्य वाटत आहे. प्रज्वल आणि प्रणिल ५०० पैकी ४४५ गुण मिळवत ८९ टक्‍क्‍यांनी उत्तीर्ण झाले. त्यांना आतापर्यंत समान गुण मिळाले नव्हते; मात्र दहावीच्या परीक्षेत हा योग जुळून आला. विशेष म्हणजे दोघांची बैठक व्यवस्था वेगवेगळ्या इमारतीमध्ये होती. दहावी परीक्षेत प्रज्वलला ५०० पैकी ४४५ गुण मिळाले, तर प्रणिलला ४४० गुण मिळाले. मात्र, त्याला क्रीडाचे पाच गुण जादा मिळाल्याने दोघांचेही गुण समान झाले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT