Rahul Gandhi Visit Dalit Family Kolhapur esakal
कोल्हापूर

दलित कुटुंबासोबत राहुल गांधींनी घेतला जेवणाचा आस्वाद; 'त्या' जेवणाचे घेतले नमुने, महत्त्वाची माहिती आली समोर

Rahul Gandhi Visit Kolhapur : व्हीआयपी, व्हीव्हीआयपी व्यक्ती दौऱ्यावर येणार असल्यास त्याचे अतिशय सूक्ष्म पद्धतीने सर्व नियोजन प्रशासनाकडून केले जाते.

सकाळ डिजिटल टीम

कोणत्याही व्हीआयपी दौऱ्यात जे काही संबंधित व्यक्ती खाणार आहेत किंवा खाल्ले त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली जाते.

कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उचगावमध्ये टेम्पो चालकाच्या घरी जाऊन जेवण केले. त्याची सर्व माहिती येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने (Department of Food and Drug Administration) घेतली आहे. गांधी यांनी खाल्लेले सर्व पदार्थ २४ तास सुरक्षित ठेवले. प्रोटोकॉलनुसार हे सर्व केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

व्हीआयपी, व्हीव्हीआयपी व्यक्ती दौऱ्यावर येणार असल्यास त्याचे अतिशय सूक्ष्म पद्धतीने सर्व नियोजन प्रशासनाकडून केले जाते. त्यामुळेच त्यांच्या दौऱ्यातील ताफ्यातील वाहनांची संख्या वाढते. नुकतेच गांधी कोल्हापुरात येऊन गेले. त्यावेळी हॉटेल सयाजी (Hotel Sayaji), मुख्य कार्यक्रम असलेल्या कसबा बावड्यातील भगवा चौक आणि विमानतळावरही अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक तैनात होते. तेथे गांधी जे काही खाणार किंवा खाल्ले त्याची खातरजमा करण्याचे काम या विभागाकडे होते.

Rahul Gandhi Visit Dalit Family Kolhapur

मात्र, गांधी अचानकच उचगावमध्ये टेम्पो चालकाच्या घरी गेले. त्यामुळे तेथे या विभागातील अधिकाऱ्यांना पोहोचता आले नाही. कारण ती अचानक भेट होती. तरीही तेथील जे जेवण गांधी यांनी खाल्ले त्याचे नमुने तेथे असलेल्या सिक्युरिटीतील पोलिसांनी घेतले होते. त्याची माहिती त्यांनी येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. पुढे गांधी पुन्हा दिल्लीत पोहोचेपर्यंत ते सर्व निरीक्षणाखाली ठेवले होते, असेही सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी सांगितले.

कोणत्याही व्हीआयपी दौऱ्यात जे काही संबंधित व्यक्ती खाणार आहेत किंवा खाल्ले त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली जाते. जे व्हीआयपी व्यक्तीने खाल्ले तेच स्थानिक व्यक्तीला खाण्यास दिले जाते. त्याच्यावर त्याचा काही परिणाम होतो काय, यावरही २४ तास लक्ष ठेवले जाते. प्रोटोकॉलप्रमाणे हे सर्व करावे लागते, असेही शिंगाडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT