Keshavrao Bhosale Theatre Fire esakal
कोल्हापूर

Keshavrao Bhosale Theatre Fire : कलाकार, तंत्रज्ञांच्या अश्रूंचा बांध फुटला; माहिती देताना हुंदके, हृदयच जळून खाक झाल्याच्या भावना

Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fire : आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाच्या जवानांची त्रेधातिरपीट उडाली.

सकाळ डिजिटल टीम

''नाट्यगृह म्हणजे आमचं हृदय आहे आणि ते असे जळताना पाहून आम्हाला मोठा धक्काच बसला. आमच्याच डोळ्यांनी आम्ही हे पाहतो आहे का, अशीच भावना होती.''

कोल्हापूर : आग लागल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्याची गर्दी नाट्यगृहाच्या परिसरात लोटली. त्यांना हटविताना पोलिसांना नाकीनऊ आले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंती (Sangeetsurya Keshavrao Bhosale Jayanti) दिनाच्या आदल्या दिवशी लागलेल्या आगीने नागरिक मात्र हळहळले. आग लागल्याचे कळताच कलाकार मंडळी नाट्यगृहाच्या परिसरात पोहोचली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते हुंदके देत मित्र परिवाराला नाट्यगृहाला आग लागल्याची माहिती मोबाईलवरून देत होते.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात आजपासून (ता. ९) होणार होती. त्यासाठी नाट्यगृहाच्या परिसरात मंडप उभारणीचे काम सुरू होते. स्टेजवरील अंतर्गत काम आटोपून कर्मचारी परतल्यानंतर रात्री अचानक नाट्यगृहाला आग (Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fire) लागली.

ती आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ महापालिकेचे अग्निशमन दल नाट्यगृहाच्या परिसरात पोहोचले. आगीचे लोट इतके तीव्र होते की, आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाच्या जवानांची त्रेधातिरपीट उडाली. मुख्य प्रवेशद्वारापासून आत मंडप उभारल्याने अग्निशमन दलाची गाडी आत नेताना चालकांना कसरत करावी लागली.

नाट्यगृहातील असुविधांबाबत वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा सुरू होता. पण, निधीअभावी अनेक कामे प्रलंबित राहिली. अशी घटना घडेल असे कधीच वाटले नव्हते. याच नाट्यगृहात कलाकार-तंत्रज्ञांनी पहिले पदार्पण केले आणि पुढे त्यांनी मराठी, हिंदी नाटकांसह सिनेसृष्टी गाजवली. हा वारसा पुन्हा उभारला पाहिजे.

- आनंद कुलकर्णी, अध्यक्ष, मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर

आयुष्यात कधी स्वप्नातही वाटले नव्हते की असे दृश्य पाहावे लागेल. संगीतसूर्य केशवराव भोसले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची तालीम सुरू असतानाच ही बातमी समजली आणि आम्ही धावत आलो. पण, हे सारे धक्कादायक आहे. कुणी जाणीवपूर्वक तरी हे केले नसेल ना, हे पाहावेच लागेल.

- अजय कुरणे, दिग्दर्शक

नाट्यगृह म्हणजे आमचं हृदय आहे आणि ते असे जळताना पाहून आम्हाला मोठा धक्काच बसला. आमच्याच डोळ्यांनी आम्ही हे पाहतो आहे का, अशीच भावना होती. ज्या स्टेजवर आम्ही घडलो ते स्टेजही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आम्ही सारे मिळून नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी पाठपुरावा करू.

- संतोष शिंदे, अभिनेता

नाट्यगृहाच्या साक्षीने अनेक जण कला क्षेत्रात तळपले. पण, हे नाट्यगृहच आगीत भस्मसात होताना आम्हाला पाहायला लागले. नाट्यगृहात सुविधांसाठी आमचा लढा सुरूच होता, पण आता पुन्हा नव्याने नाट्यगृहाचीच उभारणी करावी लागणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वात पुढे असू.

- श्वेता मोकाशी, अभिनेत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT