sangli sakal
कोल्हापूर

Sangli : तासगावला तलाव, ओढे ओव्हरफ्लो

तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग आतापर्यंत ३७५ मिलिमीटर नोंद

सकाळ वृत्तसेवा

तासगाव : तासगाव तालुक्यात यावर्षी पावसाने जोरदार बॅटिंग सुरूच ठेवली असून बहुतांश तलाव, ओढे भरून वाहत असल्याचे चित्र आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी आतापर्यंत दुप्पट पाऊस नोंदविला गेला आहे. अजूनही परतीच्या पावसाची नक्षत्रं शिल्लक आहेत. आतापर्यंत सरासरी ३७५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

तासगाव हा जिल्ह्यात कमी पावसाचा तालुका ओळखला जातो. त्यातच तालुक्याचा पूर्वभाग अत्यंत कमी पावसाचा असा आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी वरुणराजाने चांगली कृपा दाखविली आहे. जून आणि जुलैच्या सुरवातीला पेरण्या लांबण्याइतपत पाऊस लांबला. मात्र त्यानंतर जो पाऊस सुरू आहे, तो थोडीशी दिलेली उघडीप वगळता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दररोज पावसाची हजेरी असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात आतापर्यंत सरासरी ३७५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. त्यामधे सावळज मंडलात सर्वाधिक ५९६ मिलिमीटर, तर सर्वांत कमी मांजर्डे मंडलात २९९ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. तासगाव शहर ३४३, येळावी ३५०, मणेराजुरी ३०९, विसापूर ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी ११ सप्टेंबरअखेर तालुक्यात २१५ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला होता.

गेल्या काही वर्षांत सलग असा प्रथमच पाऊस पडला. तासगाव तालुक्यात दरवर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असतो. मात्र यंदा तालुक्यातील तलाव ऑगस्टमध्येच भरून वाहू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. तालुक्यातील सिद्धेवाडी तलावाचे पाणी सांडव्यावरून वाहत आहे. पेड, लोढे, बलगवडेसह ग्रामीण भागातील गावतलाव, ओढे दुथडी वाहत असल्याचे चित्र असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नेटवर्कवर १०८ वातानुकूलित लोकल गाड्या चालवत

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT