Sangli, Satarkars are now in Kolhapur ... 
कोल्हापूर

सांगली, सातारकरांनो आता या कोल्हापुरात... 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये कामानिमित्त येणाऱ्या सांगली, सातारा जिल्ह्यातील कामगार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दैनंदिन पास दिला जाणार आहे.

कोल्हापूरमधून सांगली, साताऱ्यामध्ये जाणाऱ्यांनाही जिल्हाधिकाऱ्यांकडून पास दिला जाणार आहे. दरम्यान, उद्योग, शासकीय विभाग, बॅंक कर्मचारी व खासगी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या शिक्षण, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पास देण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. पासअभावी होणारी सर्वसामान्यांची होणाऱ्या कोंडी "सकाळ'मधून वारंवार मांडली होती. 

देसाई म्हणाले, ""जिल्ह्यातील कामगार, शिक्षक, प्राध्यापक सांगली व सातारा जिल्ह्यात जातात. सतेच सातारा, सांगलीतून मोठ्या प्रमाणात विविध उद्योगातील कामगार, कारागीर, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी येत आहेत. या सर्वांना एक दिवसाचे पास दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली व सातारा जिल्ह्यात जाणाऱ्यांना दैनंदिन पास दिले जाणार आहे. त्यासाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त केले आहेत. राज्यातील उद्योग वाढीसह इतर कार्यालयातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामूुळे दैनंदिन पास दिले जाणार आहेत.'' 

या कागदपत्रांची आवश्‍यकता : 
- कामाच्या ठिकाणचे प्रमाणपत्र 
- आधारकार्ड किंवा रहिवासी दाखला 
- व्यक्तीचे ओळखपत्र 

प्राधिकृत अधिकारी* यांना देणार पास 
- जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक* औद्योगिक विविध उद्योग, खाजगी कार्यालये 
- करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी तहसीलदार* शासकीय विभाग, बॅंक कर्मचारी 
- गटशिक्षणाधिकारी* खाजगी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये 


कोल्हापूर, सांगली व अन्य भागात जाणाऱ्या कामगारांना व अन्य संबंधितांना जाण्यासाठी दैनंदिन पास द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने जिल्हाधिकारी देसाई यांच्याकडे मागणी केली होती. देसाई यांनी ही मागणी मान्य केल्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजे. "सकाळ'ने ही या विषयावर परखडपणे आवाज उठवल्याने 4000 कामगारांच्या उदरनिर्वाहचा प्रश्‍न मार्गी लागला. 
- ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT