puikhadi filter house center
puikhadi filter house center Sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : फिल्टर हाऊसमध्ये ५८८७ घनफूट गाळ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - दोन वर्षांत स्वच्छता न केल्याने पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील सेटलिंग टाकीत दोन ते तीन फूट उंचीचा गाळ साठला होता. त्यामुळे शहरात गाळयुक्त पाण्याचा पुरवठा होत होता. अनेक घरांतील टाक्यांत माती साठलेली होती. या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याच्या कामास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आजपासून सुरुवात केली. दिवसात दोन फायर फायटरच्या सहाय्याने एका टाकीतील ५८८७ घनफूट गाळ काढला. त्यामुळे ए,बी,ई वॉर्ड तसेच संलग्न उपनगरे, ग्रामीण भागास कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. उद्यापासून त्याचा जास्त परिणाम जाणवणार असल्याने टॅंकरची मागणी वाढणार आहे.

पावसाळ्यात पाण्याबरोबर येणारी माती वेगळी करण्याचे काम जलशुद्धीकरण केंद्रात सेटलिंग टाकी करते. पुईखडीला दोन टाक्या आहेत. दोन वर्षे कोरोनामुळे त्यातील गाळ काढला नव्हता. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळ काढण्याचे नियोजन केले. आज सकाळपासून दोन फायर फायटरच्या सहाय्याने टाकीच्या तळातील तसेच भिंतीवरील गाळ दूर करण्यास सुरुवात केली. दिवसभरात साधारणत: दोन ते तीन फूट साठलेला गाळ १५ कर्मचारी व दोन फायर फायटरच्या साहाय्याने काढला. बुधवारी (ता. १८) दुसऱ्या टाकीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर गुरुवार संप आणि पंप हाऊसमधील गाळ काढण्यात येईल.

जल अभियंता हर्षजित घाटगे व शाखा अभियंता प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. पुईखडी केंद्रावरून ए,बी,ई वॉर्ड, संलग्न उपनगर भागात दिवसभर कमी दाबाने पाणी आले. काही उंच भागात पाणी पोहचले नाही. मात्र, पूर्वकल्पना असल्याने नागरिकांनी पाण्याची तजवीज केली. आणखी दोन दिवस टाकी बंद राहणार असल्याने उद्यापासून नागरिकांची पाण्याची मागणी वाढणार आहे.

येथे कमी पाणीपुरवठा

फुलेवाडी रिंगरोड, जिवबा नाना, हरीप्रियानगर, सानेगुरुजी वसाहत, राजे संभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखेनगर टाकीवर अवलंबून असलेला परिसर, राजीव गांधी, कात्यायनी, योगेश्वरी कॉलनी, शिवाजी पेठ, मिरजकर तिकटी, वारे वसाहत, संपूर्ण मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, रामानंदनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, कळंबा उंच टाकीवर अवलंबून असणारा परिसर, सुभाषनगर परिसर, शेंडापार्क परिसर, जवाहरनगर, वाय.पी. पोवारनगर, मिरजकर तिकटी.

राजारामपुरी पहिली ते तेरावी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेंशन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतिनिकेतन, ग्रीनपार्क, शाहूपुरी पहिली ते चौथी गल्ली, व्यापार पेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल, महाडिक वसाहत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT