sant dnyaneshwar maharaj horses will be traveling 
कोल्हापूर

माऊलींच्या अश्वांचे प्रस्थान तर होणारच! पण असे..

सकाळ वृत्तसेवा

अंकली : वारकरी सांप्रदायासह प्रत्येक भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या माऊलींच्या अश्वांचे प्रस्थान सोहळा एकीकडे लॉकडाउनच्या नियमांचे पालन तर दुसरीकडे वंशपरंपरागत चालत अालेले  रितीरिवाज यांचा सुवर्णमध्य साधत पार पाडणार असल्याची माहिती श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी अंकली येथील राजवाड्यात आज (ता. २) प्रस्थान विधीप्रसंगी दिली.
 

दरवर्षी आषाढीवारीसाठी अंकली (ता. चिक्कोडी) येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा मानाच्या अश्वांचा अंकली-आळंदी असा प्रवास घडत. यावर्षी कोरोनामुळे  नियमांचे बंधन घालण्यात आल्याने प्रवास करणे शक्य नसले तरी परंपरागत रितीरिवाजांचा मान राखून प्रस्थानाचे सर्व विधी पार पाडण्यात आले. 

अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात सकाळी ११ वाजता अंबाबाई मंदिरात पूजन, आरती व जरीपटक्याचे पूजन करण्यात आले.  दोन्ही अश्वांचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार व महादजीराजे शितोळे सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विहानराजे शितोळे सरकार व निवडक वारकरी यावेळी उपस्थित होते. दिंडी व  दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी करून दर्शन घेतले.  


वारीची परंपरा अबाधित राखणार 

शितोळे सरकार घराण्याची माऊलीच्या अश्वांची परंपरा १८८ वर्षांची आहे. शितोळे घराण्याच्या अनेक पिढ्या वारी करत आहेत. चालत आलेल्या परंपरा खंडीत न करता आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात अंकली येथे चालवणार आहोत. येथे विठ्ठल व ज्ञानेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी वारी काळात चालणाऱ्या सर्व विधींची पूर्तता करणार असून काळानुरूप घडणारे बदल स्वीकारून वारीची परंपरा अबाधित राखणार असल्याची माहिती श्रीमंत उर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांनी दिली.


अंकली ही प्रति आळंदी

अंकली गावास शितोळे सरकार घराण्याकडून भक्तीचा वारसा लाभला आहे. माऊलींच्या अश्वाचे वास्तव्य या ठिकाणी असल्याने गावास प्रति आळंदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यावर्षी परिस्थितीनुसार वारीचे विधी येथेच पार पडणार असल्याचे श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

Tembhapuri Dam Tragedy: टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप

Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT