बामणी ता कागल येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेला रिंगण सोहळा sakal
कोल्हापूर

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या,अश्वांचा गोल रिंगण सोहळा

डोळ्याचे पारणे फेडणा-या रिंगण सोहळ्याचे पांडुरंग भजनी मंडळातर्फे आयोजन केले होते.

पंडीत कोईगडे

सिद्धनेर्ली : बामणी ता. कागल येथे माऊलीच्या नावाच्या अखंड जयघोषात,हजारो वैष्णव व भाविकभक्तांच्या उपस्थितीत डोळ्यांचे पारणे फेडणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मानाच्या आश्वांचा गोल रिंगण सोहळा पार पडला.डोळ्याचे पारणे फे डणा-या या रिंगण सोहळ्याचे येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या १२६व्या वर्षानिमित पांडुरंग भजनी मंडळाने आयोजन केले होते. त्यामुळे या ठिकाणचे वातावरण हरीनामाने दुमदुमले होते. श्रीक्षेत्र आळंदीच्या रिंगण सोहळ्याच्या धरतीवर याच सोहळ्यातील मानाच्या अश्वांना पाचारण केले होते .यावेळी आश्वंचा पाठशिवणीचा खेळ भाविकांनी अनुभवला.इश्वर चरणधुळीचे महत्व असलेल्या आश्वांच्या पायाखालच्या माती भाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली.

सकाळी आठ वाजता श्री. क्षेत्र विठ्ठल -रखुमाई मंदिर येथून प.पु. अमृतानंद महाराज, प.पु.जंगली महाराज व सरपंच रावसाहेब पाटील यांच्या हस्ते वीणा व अश्व पूजनाने या दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये पारंपरिक वेशभूषेत आबालवृद्ध भाविक सहभागी झाले. महिलांसह चिमुकल्यांची उपस्थिती लक्षणीय होती. गावातील प्रमुख मार्गा वरून श्रींची पालखीसह,लवाजमा, मानाचे अश्‍व असा ताफा टाळमृदुंगाच्या गजरात निघाला. श्री हनुमान मंदिर चौक व श्री गणेश मंदिर चौक येथे दोन उभे रिंगण सोहळे झाले.या दरम्यानअभंग,नाम गजरावर घरलेला ठेका,फुगडीचा फेर यामुळे आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

साडेअकरा वाजता मुख्य रिंगण सोहळ्याचे ठिकाण श्रींची पालखी, मानाचे अश्व,संतमंडळी व भाविक दाखल झाले. रिंगण मार्गावर प्रथम पताकाधारी वारकऱ्यांची प्रदक्षिणा झाली. त्यानंतर श्रींच्या पालखी व प्रवचनकारांची प्रदक्षिणा झाली. त्यानंतर मानाच्या अश्वांचा मुख्य रिंगण सोहळा पार पडला. पाच वेळा हे रिंगण पूर्ण केले. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक व नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी मंडळाचे अध्यक्ष यशवंत मगदूम व उपाध्यक्ष पांडुरंग मगदूम यांचा सत्कार केला.

चिमुकल्यांची संतांची वेशभुषा

या संपूर्ण दिंडी सोहळ्यात सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, निवृत्ती, ज्ञानदेव, तुकाराम या संतांच्या वेशभूषा चिमुकली मुले सहभागी झाली होती. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उन्मेश पाटील, ऋषिकेश मगदूम, आदर्श बाबर, राम तारदाळे, राजवर्धन पाटील व वैदेही मगदूम यांनी या वेशभूषा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai High Court: राज्यात आमदार-खासदारांवर ३९८ खटले, लवकर निकाली काढा; हायकोर्टाचे विशेष न्यायालयांना आदेश

पटेलांनी टोचलेल्या इंजेक्शनचा परिणाम, तब्येतीचं कारण सांगत आणखी एका नेत्यानं पालकमंत्रीपद सोडलं; काय घडलं?

Gmail Safety Tips : तुमचं Gmail हॅक तर झालं नाहीये ना? आत्ताच पाहा नाहीतर होईल खूपच उशीर..सर्व लॉगिन डिवाइस चेक करा एका क्लिकवर

Kolhapur Farmers : मराठवाडा नाही कोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल, राधानगरी तालुक्यातील धक्कादायक घटना...

AFG vs BAN : अफगाणिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड! वन डे क्रिकेटच्या इतिहासात असा विजय मिळवणारा जगातील एकमेव संघ

SCROLL FOR NEXT