crime case in kolhapur ichalkaranji attack cloth shop employees 
कोल्हापूर

इचलकरंजी हादरली : तलवारीने सपासप वार करीत तरुणाचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील स्टेशन रोडवरील हॉटेल जमजमसमोर तरुणाचा शनिवारी (ता. १६) रात्री निर्घृण खून करण्यात आला. संतोष ऊर्फ पप्पू श्रीकांत जाधव (Santosh Jadhav) (वय 42, रा. गणपती कट्टा, जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम काणे (Shubham Kane) याच्यासह सात जणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. घटनास्थळी हल्ल्यात वापरण्यात आलेली तलवार पडली होती. या घटनेनंतर परिसरात दगडफेक आणि जाळपोळसारखे प्रकार घडल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,

जाधव याचे हॉटेल आहे. हॉटेलमधील कामगार व संशयित काणे यांच्यात वाद झाला होता. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. त्यानुसार यातील संशयितांचा सायंकाळी पोलिस शोध घेत होते. मात्र, रात्री साडेअकराच्या सुमारास शुभम काणे, आदित्य सुतार आदी सात जणांनी तलवार, कोयता, चाकू यांचा वापर करीत जाधव यांच्यावर हल्ला करीत सपासप वार केले. तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. त्यानंतर संशयितांनी त्याच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर संशयितांनी तलवार घटनास्थळी टाकून पलायन केले. जाधव याला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

जाधव याच्या डोके, चेहरा, दोन्ही हात, छाती आदी शरीराच्या विविध ठिकाणी वार केले आहेत. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. यातील काही संशयितांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच, जाळपोळही करण्यात आली. त्यामुळे परिसरातील पोलिस ठाण्यांकडून जादा पोलिस कुमक मागवण्यात आली. दरम्यान, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT