Santosh Shinde Death Case accused former corporator and police officer detained in Solapur Crime news  
कोल्हापूर

Santosh Shinde Death : अखेर सोलापूरच्या हॉटेलात सापडले संतोष शिंदेंचे गुन्हेगार! माजी नगरसेविका अन् पोलिस अधिकारी ताब्यात

रोहित कणसे

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आता त्याच्या सुसाइड नोटमध्ये नावे असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने माजी नगसेविका आणि पोलीस अधिकाऱ्याला सोलापूर येथील एका हॉटेलातून ताब्यात घेतले आहे. त्यांची सध्या सोलापूर येथे चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडणीच्या त्रासाला कंटाळून संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहीलेल्या चिट्ठीत चार जणांची नावे आढळून आली होती. त्यामध्ये माजी नगसेविका आणि एका पोलीस अधिकाऱ्यासह पुण्यातील दोन उद्योजकांची नावे होती. यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्या नोटमध्ये म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी पथके रवाना झाली होती.

मात्र ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच ही माजी नगरसेविका आणि पोलिस आधिकारी हे दोघे गडहिंग्लज येथून फरार झाले होते. त्याच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची पाच पथक रवाना झाली होती. अखेर ही दोघं सोलापूर येथील एका हॉटेलात सापडले. पुण्यातील दोघांचा अद्यापही पोलिसांकडून शोध सुरू आहे.

संतोष शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांमध्ये त्यांना जवळपास महिनाभर तुरुंगामध्ये जावे लागले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते खूपच तणावामध्ये होते. तरीसुद्धा त्यांनी पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्यांनी टोकाचे पाऊल उचलत कुटुंबासह जीवन संपवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT