Sari was found in Kolhapur during the corona survey 
कोल्हापूर

कोरोनाच्या सर्व्हेक्षणावेळी आढळला सारी

युवराज पाटील

कोल्हापूर ः शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आज महापालिकेच्या सर्वेक्षणात सारीची लक्षणे असलेले 39 रुग्ण आढळले. "माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत शहरात 171 जणांचे स्वॅब घेण्यात आले. दिवसभरात नऊ हजार 892 घरे, तसेच 44 हजार 98 इतक्‍या लोकांचे सर्वेक्षण झाले. सारी हा असाच एक संसर्गजन्य रोग असून डेंगी, चिकनगुनियासदृश लक्षणे सारीमध्ये आढळून येतात. हा आजार गंभीर नसला तरी सर्दी, ताप व अंगदुखी अशी लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय सल्ल्याने उपचार सुरू करावेत, असे आवाहन महापालिका आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी केले आहे.

शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेला आता कोरोनानंतर सारीच्या उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत. शहरातील अकरा कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू असून सदर बाजारमधील तीन हजार 579, कसबा बावडा येथे चार हजार 653, महाडिक माळ येथे तीन हजार 621, सिद्धार्थनगरात चार हजार 820 या भागासह फुलेवाडी, मोरे-माने नगर, आयसोलेशन, पंचगंगा रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय, तसेच राजारामपुरी केंद्रांतर्गत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

संपादन ः रंगराव हिरडेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT