Sarpanch For 26 Villages In Ajara Taluka Next Year Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजऱ्यातील 26 गावांना आता पुढच्या वर्षीच कारभारी

रणजित कालेकर

आजरा : आजरा तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत जुलै ते डिसेंबर 2020 अखेर संपली. या ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक आहेत. निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना व आरक्षण सोमवारी (ता. 2) जाहीर केली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागात राजकीय घडामोंडीना सुरवात झाली असून 26 ग्रामपंचायतींची निवडणूक पुढील वर्षी जानेवारीमध्ये होण्याची शक्‍यता आहे. 

जुलै ते डिसेंबर 2020 अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर कोरोनामुळे प्रशासक नियुक्त केले. नुकतेच अनलॉक पाच जाहीर करण्यात आला. यात निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया राबविण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यास अनुसरून आजरा तालुक्‍यातील मुदत संपलेल्या 26 ग्रामपंचायतीची आरक्षण व प्रभाग रचनेची अंतिम यादी 2 नोव्हेंबरला केली जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या नोटीस फलकावर ही प्रसिध्द केली जाईल. 

या गावात निवडणुक 
तालुक्‍यातील महागोंड, मुमेवाडी, चव्हाणवाडी, खोराटवाडी, जाधेवाडी, बेलेवाडी हु, हालेवाडी, चिमणे, गवसे, देवर्डे, एरंडोळ, देवकांडगाव, हाळोली, हात्तीवडे, होनेवाडी, कासारकांडगाव, मुरूडे, सुळे, निंगुडगे, सरोळी, किणे, कोवाडे, मलिग्रे, सिरसंगी, वाटंगी, पेद्रेवाडी या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या 26 गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका जानेवारी 2021 होण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT